आईच्या खून प्रकरणी संशयित मुलास 14 डिसेंबरपर्यत कोठडी

0

जत,प्रतिनिधी : जत शहरातील दुधाळवस्ती येथे स्वत:च्या आईचा नातवासमोर चाकूने भोकसून खून करणाऱ्या संशयित श्रीकांत राजाराम जाधव (वय25)याला न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने 14 डिंसेबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली.

ज्याच्याकडून आयुष्याचा आधार समजला त्यांच्याकडून मरण येण्याची सुन्न होणारी घटना जत शहरात घडली आहे.दारूचे व्यसन,पैशाची चणचण यामुळे आईला सतत पैसे मागणाऱ्या मुलांला आई वैतागली होती.दुसरीकडे गुन्हेगारी प्रवृत्ती,व्यसनी,व जूगार,मटका यात पैसे घालविल्याने मुलगा श्रीकांत पैशाची चणचण भासत होती.यातून त्याने आईवर यापुर्वी दोन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र शेजाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने आई बचावली होती.मात्र पैशाची मागणी कायम होती.पतीच्या निधनानंतर आपल्या पञ्याच्या घरात आई मंजूळा पवन ऊर्जा कंपनीतील कर्मचाऱ्यांना स्वंयपाक करण्याचे काम करून उदरनिर्वाह करत होती.आई मंजूळाला मुलगी स्वातीचा आधार होता.त्यांचा चार वर्षीय मुलगा आयुष मंजूळा सोबत राहत होता.

गुरूवारी श्रीकांतने आईकडे पैशाची मागणी केली.मात्र आईने तु काहीतरी कामधंदा करत जा माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून सुनावले होते.मात्र श्रीकांतला पैशाची गरज असल्याने त्यांने आईला पैसे दे म्हणून मारहाण सुरू केली.घाबरलेल्या मंजूळा माराच्या भितीने आरडाओरडा करत रस्त्यावर पळत आल्या.डोक्यात सैतान शिरलेल्या श्रीकांत जन्म दिलेल़्या आईवर आपण हात उचलतोय यांचेही भान राहिले नाही.त्यांने आईच्या मागे धावत येत आपल्याकडील धारदार चाकू आईच्या पोट्यात खुपसला एक जोराची किंकाळीत आईचा अंत झाला.तसा नराधाम श्रीकांतने पळ काढला.काही अंतरावर चाकू टाकून देत कोल्हापूर गाठले.घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली.डिवायएसपी कार्यालयाची टिमने खबऱ्यांच्या माहितीवरून त्याच्या कोल्हापूरात मुशक्या आवळल्या.शनिवारी श्रीकांतला पोलीसांनी न्यायालयात हजर केले.न्यायालयाने त्याला 14 डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली.घटनास्थळ,मुलगी स्वाती,नातू आरूष यांचे जाबजबाब यानंतर संशयित श्रीकांतवर आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. अधिक तपास सा.पो.नि.महेश मोहिते करत आहेत.


Rate Card
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.