पैशासाठी जन्मदातीची हत्या | जतमधिल घटना : पोटात चाकू खुपसला,संशयित ताब्यात

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : तळहाताच्या फोडाप्रमाणे संभाळलेल्या सपुत्रानेच जन्मदात्या आईला घरातून रस्त्यावर ओडत आणून पोटात धारदार शस्ञाने वार करून खून केल्याची घटना दुधाळवस्ती जत येथे गुरूवारी मध्यरात्री उघडकीस आली.मंजूळा राजाराम जाधव (वय43),रा.दुधाळवस्ती  असे हत्या झालेल्या आईचे नाव आहे. त्यांची मुलगी स्वाती दयानंद गायकवाड वय 22 यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मंजूळा यांचा मुलगा श्रीकांत राजाराम जाधव (वय25) विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,जत शहरातील दुधाळवस्ती येथे मंजूळा चार वर्षीय नातू व संशयित मुलासोबत राहत होत्या.पवनऊर्जा कंपनीत त्या स्वंयपाकाचे काम करून उदरनिर्वाह करत होत्या.मुलगा श्रीकांत किरकोळ कामे करत होता.मात्र उत्पन्नात त्याचा खर्च भागत नसल्याने आईकडे तो वारवांर पैशाची मागणी करत होता.त्याच्यात भांडणे होत होती.यापुर्वी दोन वेळा त्यांने आईवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र शेजारच्या लोकांनी मध्यस्थी करत भांडण सोडविले होते.

श्रीकांत जाधव हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता,तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून पूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेला होता. दारू पिणे, जुगार खेळणे हा त्याचानित्यक्रम होता.त्यांच्यावर यापुर्वी पोलीसात गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास श्रीकांतने आई मंजुळाकडे दारू पिण्यासाठी काही पैसे मागितले.तिने नकार दिल्याने श्रीकांतने आईवर हल्ला केला.यात मंजूळा जिवाच्या अंक जाता ने ओडत बाहेर पळत आल्या,श्रीकांत तसाच तिच्या मागे आला, रस्त्यावर तिच्या पोटात धारदार शस्ञाने हल्ला केला.जखमी अवस्थेत शेजाराच्या लोकांनी तिला उपचार्थ नेहण्याचा प्रयत्न केला.मात्र घाव वर्मी लागल्याने रक्तस्राव होऊन तिचा जागेवर मुत्यू झाला.जन्म दिलेल्या आईचा रस्त्यावर पडलेला मतृदेह पाहून श्रीकांतने पळ काढला.मध्यरात्री पोलीसांना माहिती मिळताच मृत्तदेह ताब्यात घेत उत्तररीय तपासणी करून मुळ गाव असलेल्या जाड्डरबोबलाद येथे मयत मंजूळा यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान पोलीसांनी सशयिंत श्रीकांतच्या मागे तापसाची चक्रे फिरवली.त्याला सांगलीतून ताब्यात घेतले आहे.त्यांने हल्ला करण्यासाठी वापरलेले शस्त्र विद्युत कॉलनी परिसरात टाकले होते.अधिक तपास सा.पो.नि.मोहिते करत आहे.

संशियत श्रीकांत जाधव

Attachments area

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.