पांढरेवाडीतील विकासकांमचे भूमिपुजन

जत,प्रतिनिधी : पांढरेवाडी ता.जत येथील ग्रामपंचायत इमारत,दलितवस्तीतील सिंमेट कॉक्रीट,गटार कामाचे भूमिपुजन जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांच्याहस्ते झाले.यावेळी संरपच बिराप्पा तांबे,उपसंरपच विलास पांढरे,माजी संरपच मायाप्पा शिंदे,नरळे गुरूजी,सोनाप्पा मानवर,रेवाप्पा पांढरे,चंदू जावीर,मनगा कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.पांढरेवाडी येथील सुसज्ज इमारत बांधकामासाठी 20 लाख त्यात 12 लाख जनसुविधा,8 लाख 14 व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध झाले आहेत.तर दलित वस्तीसाठी कॉक्रीट रस्ता,गटारीच्या कामासाठी 8 लाख रूपयाचे कामे सुरू झाले आहेत.सरपच बिराप्पा तांबे म्हणाले,पांढरेवाडीतील विकासाच्या आम्हच्या प्रयत्नाला यश येत आहे. जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला होता.गावातील दलित वस्तीसाठी एवढा मोठा निधी पाटील यांच्या माध्यमातून मिळाला आहे. यातून ग्रामपंचायतीचे अत्याधुनिक व सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे.तर दलित वस्तीतील रस्ते,गटारी मजबूत करण्यासाठी या निधीचा फायदा होणार आहे. जिल्हा परिषद सदस्य पाटील यांचे आभार मानत तांबे यांनी गावाच्या विकासासाठी मोठा फायदा झाल्याचे शेवटी सांगितले.
पांढरेवाडी ता.जत येथील ग्रामपंचायत इमारत व दलित वस्तीसाठी कामाचे भूमि पुजन जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.