संख | आता सीसीटिव्हीच्या कक्षेत | निलांबिका बसवेश्वर गणेश मंडळाकडून दिलेले पहिले 5 कँमेरे सुरू |

0
Rate Card

संख,वार्ताहर : संख ता.जत येथील चोरीसह अन्य घटनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य शिवाजी चौकासह अन्य चार ठिकाणी सीसीटिव्ही कँमेरे बसविण्यात आले.निलांबिका बसवेश्वर गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवात अनावश्यक खर्चाला फाटा देत हे सुमारे 40 हजार खर्चून 5 कँमेरे देण्यात आले आहेत.

त्यांचे उद्घाटन उमदी पोलीस ठाण्याचे सा.पोलीस निरिक्षक दत्तात्रय कोळेकर व उपनिरिक्षक श्री.दांडगे यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी मंडळाचे मार्गदर्शक तथा निलांबिका बसवेश्वर शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन सुभाष पाटील,बाजार समिती संचालक देवगोंडा बिराजदार,जि.प.च्या माजी सभापती सुजाता पाटील,मलिकार्जून सायगाव,सुरेश पाटील,कुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पो.नि.कोळेकर म्हणाले,संख गाव भागातील चोरीसह विविध घटनेतील आरोपी यामुळे लवकर पकडणे शक्य होणार आहे. गाव भागातील अन्य चौकात 8 कँमेरे बसविणे गरजेचे आहे. सध्या पाच ठिकाणी हे कँमेरे बसविण्यात आले आहेत.आमच्या चौकीत या कँमेरेचे रेकार्ड होणार आहे. त्यामुळे यापुढे सर्व ठिकाणी आमची नजर असेल.

मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब फुटाणे,उपाध्यक्ष शंकर पाटील,सचिव कुमार पाटीसह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

संख येथे निलाबिंका बसवेश्वर गणेश मंडळाच्या वतीने बसविण्यात आलेल्या कँमेरेच्या यंत्रणेचे उद्घाटन करताना पो.नि.दत्तात्रय कोळेकर व मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.