सांगली | बचाव कार्यासाठी एनडीआरएफ व एसडीआरएफची जादा कुमक – जिल्हाधिकारी |

0

– कोयना, वारणा, अलमट्टी धरण प्रशासनाशी समन्वय

– 1 लाख, 19 हजार 176 लोक व 25 हजार 260 जनावरांचे पुनर्वसन

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी झटत आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारणची आणखी ३ पथके (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारणची २ पथकांना (SDRF) पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या प्रत्येक टीममध्ये ४ बोटी व २५ जवान असून एसडीआरएफच्या पथकात प्रत्येकी २ बोटी व २८ जवान आहेत. याशिवाय महाबळेश्वर येथून ५ बोटी तर करमाळ्यावरून ५ बोटी मागविण्यात आल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत हे सर्वजण दाखल होतील. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

कोयना व वारणा धरण क्षेत्रात ३ ऑगस्ट नंतर अतिवृष्टी झाल्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मिरज, पलूस, वाळवा, शिराळा व महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 23 हजार 925 कुटुंबातील 1 लाख, 19 हजार 176 लोक व 25 हजार 260 जनावरांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. जिल्ह्यात १ जून ते आजअखेर सरासरी ५०७ मि.मी. पाऊस झाला आहे. यामध्ये शिराळा (१५१९.९) मि.मी. तर कडेगाव (६२३.६) मि.मी. हा जास्त तर आटपाडी (१८१.१) मि.मी. व जत (१७१.५) मि.मी. झाला आहे. कोयना धरणात ९७.५३ टक्के पाणीसाठा, वारणा धरणात ९३.३७ टक्के, अलमट्टी धरणात ८५.६९ टक्के पाणीसाठा आहे. आज रोजी ५७.५ फूट आयर्विन पूल येथे पाणी पातळी आहे. 

मिरज तालुक्यातील ६ (बामणी, जुनी धामणी, अंकली, हरिपूर, मौजे डिग्रज, ढवळी), वाळवा तालुक्यातील २ (शिरगाव, भरतवाडी), पलूस तालुक्यातील २० (भिलवडी, तावदरवाडी, सुखवाडी, राडेवाडी, सूर्यगाव, तुपारी, बुर्ली, नागराळे, दह्यारी, घोगाव, पुणदी तर्फे वाळवा, पुणदीवाडी, अनुगडेवाडी, अमणापूर, चोपडेवाडी, खटाव, ब्रम्हनाळ, नागठाणे, दुधोंडी, अंकलखोप) अशा जिल्ह्यातील २८ गावांचा संपर्क तुटला असून लोकांना स्थलांतरीत करण्यात येत आहे. 

पूरस्थिती हाताळण्यासाठी उपलब्ध साहित्य सामग्री

पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी  ३९ बोटी कार्यरत आहेत. तसेच आजरोजी पर्यंत एनडीआरएफची ८ पथके, २१९ जवान व २४ बोटी मिरज व पलूस तालुक्यात कार्यरत आहेत. टेरीटोरियल आर्मि कोल्हापूरची २ पथके, ६६ जवान व ३ बोटी मिरज तालुक्यात कार्यरत आहेत. कोस्टल गार्डचे १ पथक,१८ जवान व १ बोट पलूस तालुक्यात कार्यरत आहे. पुणे चिंचवड महानगरपालिकेचे पथकाची बोट इस्लामपूर येथे कार्यरत आहे. अशा एकूण १२ पथकांची ३०३ जवानांची व २९ बोटींची मदत पूरस्थिती हाताळण्यात होत आहे. यामध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारणची आणखी ३ पथके (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारणच्या २ पथकांना (SDRF) पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या प्रत्येक टीममध्ये ४ बोटी व २५ जवान असून एसडीआरएफच्या पथकात प्रत्येकी २ बोटी व २८ जवान आहेत. याशिवाय महाबळेश्वर येथून ५ बोटी तर करमाळ्यावरून ५ बोटी मागविण्यात आल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत हे सर्वजण दाखल होतील.

अन्य उपलब्ध साहित्य सामग्री

पूरस्थितीचा सामना करण्यासाठी विविध साधनसामग्री जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहे. यामध्ये 6 टॉर्च, 117 लाईफ जॅकेटस्‌, 54 लाईफ बॉयज, 8 हेल्मेट्स, 3 दोरखंड, 24 मेगाफोन, 22 लाईटनिंग सिस्टिम्स यांचा समावेश आहे.

प्रशासनाची सज्जता

जिल्हा स्तरावर 24 नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहे. तसेच, पाटबंधारे विभाग, महानगरपालिका आणि पोलीस विभाग येथेही 24 तास नियंत्रण कक्ष सुरू आहे. तालुका नियंत्रण कक्ष तहसील कार्यालयात कार्यान्वित आहे. आपत्कालिन साहित्य, बोटी, लाईफ जॅकेटस्, लाईफ बॉयज्‌, फ्लोटिंग पंप, मेगा फोन, बी. ए. सेट, सेफ्टी हेल्मेटस्‌, टॉर्च इत्यादि साहित्य तालुका स्तरावर तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. पुरेशा औषध साठ्याबाबत तसेच साथीचे रोग पसरू नये, यासाठी खबरदारी घेण्याबाबत आरोग्य विभागाला कळवण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग (पश्चिम) यांच्याकडील 14 रस्ते/पूल तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (मिरज) यांच्याकडील 8 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. पूरप्रवण गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यास बाधित लोकांना जिल्हा परिषद, महानगरपालिका शाळा आदि ठिकाणी सुरक्षित स्थळी तात्पुरत्या स्थलांतराचे नियोजन केले आहे.

कोयना, वारणा, अलमट्टी धरण प्रशासनाशी समन्वय

सांगली जिल्ह्यामध्ये मिरज, पलूस, वाळवा व शिराळा या तालुक्यांतील नदीकाठची एकूण 107 गावे पूरप्रवण असून, धरणातून होणाऱ्या विसर्गाच्या पार्श्वभूमिवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरण – पाटबंधारे विभाग, वारणा धरण – पाटबंधारे विभाग, अलमट्टी धरण – प्रशासन यांच्याशी समन्वय ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी बेळगाव, विजापूर, अलमट्टी प्रशासन यांना अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी 518 मीटर ते 518.50 मीटरपर्यंत स्थिर ठेवण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. 

Rate Card

बंद दळणवळण  मार्ग 

राज्य मार्ग – १६, प्रमुख जिल्हा मार्ग – ३१, इतर जिल्हा मार्ग – १ व ग्रामिण रस्ता – १ असे  रस्ते पाण्याखाली  गेले आहेत. शिवाय मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्ग बंद आहे. एसटी महामंडळाकडील सांगली, इस्लामपूर, शिराळा, पलूस असे ४५ मार्ग बंद आहेत. 

शेतीपिकांचे नुकसान

शेतीपिकांचे ११६ गावांमधील नजरअंदाजे २० हजार ५७१ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले आहे.

महावितरण विभागाकडील नुकसान

महावितरण विभागाकडील ८४ गावे संपूर्णत: बाधीत तर ५१ गावे अंशत: बाधीत झाली आहेत. १ लाख २४ हजार ८२२ ग्राहकांचा वीज पुरवठा बंद आहे. ३१/११ केव्हीची १४ उपकेंद्रे बंद आहेत. उच्चताब वाहिनीचे २४९ खांब पडले आहेत. लघुदाब वाहिनीचे ५१५ खांब पडले आहेत. ६६ वाहिन्या बंद आहेत. २ हजार २४९ वितरण रोहित्रे बंद आहेत. 

मिरज, पलूस वैद्यकीय सुविधा

मिरज, पलूस, वाळवा, शिराळा या चार तालुक्यामधून ७२ पूरग्रस्त गावांसाठी १८ प्राथमिकआरोग्य केंद्रामधून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आपत्कालिन परिस्थितीतील संपर्क क्रमांक

सांगली जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या हा कक्ष २४ तास सुरू आहे. त्याचा संपर्क क्रमांक 09370333932 वर संपर्क साधता येईल. जिल्ह्यात पडणारा पाऊस व इतर अनुषंगिक माहिती या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. आपत्कालिन परिस्थितीत या क्रमांकावर संपर्क साधावा.

अफवा पसरवू नयेत

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन अत्यंत गांभीर्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.