जत | तालुक्यातील चोऱ्यांच्या छडा | 2अल्पवयीनसह 5 जणांची टोळी जेरबंद | दोन लाखाचा मुद्देमाल जप्त |

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : जत शहर व तालुक्यात मागील सहा महीन्यात शाळा, घरफोडी, मंदीर,बंद दुकानातील चोऱ्याचा छडा जत पोलीसांनी लावला.याप्रकरणी दोन लाख दहा हाजाराचा मुद्देमालासह दोन अल्पवयीनसह पाच संशयितांना ताब्यात घेतले.सफल राजाराम कांबळे,(वय 23), निखील गणपत वाघमारे, (वय 21),तुकाराम ऊर्फ चंदु भिमराव

कांबळे,(वय 21,दिघे,रा.देवनाळ,ता.जत) व दोन अल्पवयीन संशयितांना अटक केली आहे.जत तालुक्यातील मंदिर,शाळा,घरे व बंद दुकाने फोडण्याचे प्रकार वाढले आहेत.त्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी विशेष पथक स्थापन केले होते.सोमवार दि.4 रोजी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार संशयितांना ताब्यात घेवून त्यांचेकडे विचारपूस केली असता,त्यांनी मंदीरे दानपेटी चोरी,शाळेतील एलसीडी चोरी,मोबाईल शॉपी चोरीची कबुली दिली आहे.आरोपींनी घरफोडी 4,चोरी 2,असे एकूण 6 गुन्हे केलेची कबुली पोलींसाना दिली आहे. 7 एलसीडी,1 लॅपटॉप,13 मोबाईल हॅण्डसेट,मोबाईल चार्जर,वेल्डींग मशिन,डीव्हीआर मशिन असा एकुण 2 लाख,दहा हाजार रूपयाचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे.अटक आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता ता.8 ऑगष्टपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा,अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबूले,उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, स.पो.नि.अनिल माने,पोलीस उपनिरीक्षक रणजित गुंडरे, पोहेकॉ सचिन जौंजाळ,पोलीस नाईक प्रविण पाटील,पोलीस नाईक उमर फकीर,

पोलीस नाईक प्रशांत गुरव,पो.कॉ.केरबा चव्हाण,पो.कॉ.आगतराव मासाळ यांनी केली आहे.आरोपीकडून तालुक्यातील अन्य गुन्हे उघड होणेची शक्यता असून त्यादृष्टीने आरोपींकडे तपास सुरू आहे.

जत तालुक्यातील चोऱ्यांतील जेरबंद टोळीसह पोलीस पथक 

Attachments area

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.