जत I कलम 370 हटविल्याचे जतेत स्वागत I डॉ.अमृतानंद स्वामीजीनी केले लाडूचे वाटप I

0
Rate Card

जत,प्रतिनिधी :  दुपारी बारा वाजेच्या सुमारास लोकसभेत जम्मु काश्मिरला लागू असलेले 370 कलम रद्द करणे व राज्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने जम्मु काश्मिरचे विभाजन करण्याच प्रस्ताव मांडण्यात आला आणि देशभरात आनंदाची तसेच उत्साहाची लाट पसरली.जत तालुक्यातही आंनदोत्सव साजरा करण्यात आला. बालगाव मठाचे डॉ.अमृतानंद स्वामीजी यांनी जत हनुमान मंदिराजवळ लाडू वाटप करत मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. जम्मु काश्मिरला लागलेले 370 कलमामध्ये ग्रहण संपण्याची शक्यता निर्माण होऊन त्या सीमेवरील राज्यचे प्रगतीचे सुरक्षीततेचे पर्व सुरू होईल अशी अपेक्षा देशभरात पसरली आहे.या निर्णयाचे जत तालुक्यात हिंदूत्ववादी संघटनानी स्वागत केले आहे.देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे राज्य असलेले कश्मिर व तेथील देशद्राहेची परंपरा लक्षात घेतली तर तेथील विरोधकांना व देशभरातील त्यांच्या सहकारी नेत्यांना विश्वासात घेण्याचे धोक्याचेच आहे, हे लहान्या मुलाला देखील कळेल. पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय हा एक प्रकारे राजकिय सर्जिकल स्ट्राईकचच आहे. आणि त्यात गुप्तता पाळणे आवश्यक होते.असे यावेळी डॉ.अमृतानंद स्वामीजी यांनी सांगितले.यावेळी कामाण्णा बंडगर,अलगूर महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.

कलम 370 रद्द : संखमध्ये लाडू वाटून स्वागतसंख,वार्ताहर : जम्मू-काश्मीर राज्यातील 370 कलम रद्द केल्याबद्दल बालगाव मठाचे डॉ.अमृतानंद स्वामीजी यांनी तालुक्यात आंनदत्सोव साजरा केला.जत,संख,माडग्याळ,बालगावसह अनेक गावात जात स्वामीजी यांनी लाडू वाटत मोदीचे सरकारचे आभार मानले.याशिवाय जत भाजपचे नेते माजी सभापती प्रकाशराव जमदाडे यांनीही या निर्णयाचे स्वागत केले.

जत : कलम 370 हटविल्याबद्दल जत येथे डॉ.अमृतानंद स्वामीजीनी केले लाडूचे वाटप करून स्वागत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.