जत विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेला उधान
जत,प्रतिनिधी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष ना.चंद्रकांत पाटील यांचा बालगाव मठाचे डॉ.अमृतानंद महास्वामीजी यांनी शनिवारी भेट घेतली.त्यांचे प्रदेशध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.यावेळी जतच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक विषयावर त्यांच्यात काहीकाळी बंद खोलीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. जत विधानसभेसाठी डॉ.अमृतानंद स्वामीजी चर्चेत होते.मात्र त्यांनी नुकतीच निवडणूक न लढण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भेटीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करताना बालगाव मठाचे अमृतानंद स्वामीजी