आधार व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करत गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प
आंवढी,वार्ताहर : अखिल भारतीय संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा आंवढीचे लोकप्रिय संरपच आण्णासाहेब कोडग यांना वाढदिनी दिवसभर सर्व स्तरातील मान्यवरांनी शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.
वाढदिवासाचे औचित्य साधत शनिवारी सकाळी जि.प.शाळेत विद्यार्थांना वह्या,पेनचे वाटप करण्यात आले. गावात वृक्षारोपण करण्यात आले.दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व टंचाई काळात नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व गावातील नागरिकांच्या हितासाठी काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संध्याकाळी गावात दारू बंदी करून जिल्हाभर गावचे नाव उज्वल केले आहे. आता त्यापुढे जात पुर्ण गावात व्यसनमुक्ती करण्याचा विढा वाढदिवसाच्या निमित्ताने संरपच कोडग यांनी उचलला आहे.त्यांची सुरूवात शनिवार पासून करण्यात आली.शिवबा प्रतिष्ठान आंवढी व समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था संचलित आधार व्यसन मुक्त केंद्राची स्थापना केली.या केंद्राचे उद्घाटन गावचे सुपुत्र तथा तहसीलदार दगडू कुंभार व केंद्राचे संचालक श्री.शेख यांच्याहस्ते करण्यात आली.आंवढीच्या इतिहासात वेगळेपण जपणारे संरपच आण्णासाहेब कोडग यांचा वाढदिवसही त्यांच्या कृत्वाला साजेशा पध्दतीने साजरा करण्यात आला.आंवढीकरांना शनिवार यानिमित्ताने प्रवृणी ठरला.
आंवढी ता.जत येथील जिल्हा परिषद शाळेत संरपच आण्णासाहेब कोडग यांचा सत्कार करण्यात आला.