कवठेमहांकाळ : कवटेमहांळ तालुक्यातील शिक्षणांची पंढरी होत असलेल्या मोहन माळी इटरनँशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कराटे स्पर्धेत आम्हीच चँम्पियन आहोत,हे पुन्हा एकदा सिध्द केले आहे. सांगली येथील जिल्हा क्रीडा संकुल राज्यस्तरीय कराटे स्पर्धा पार पडल्या.त्यात स्कूलच्या विद्यार्थ्यांनी
6 सुवर्ण,6 रौप्य तर 7 कास्य पदके पटकावत तिसरी चॅम्पियनशिप मिळवली.या स्पर्धेत 500 हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. कराटेमधील काता व कुमिते या क्रीडाप्रकारात शरयु युवराज माळी हिने 2 सुवर्ण पदके, वैभव पावार याने 2 सुवर्ण पदके, तर विराज पाटील,आयुष बंडगर,यांनी प्रत्येकी 1 सुवर्ण पदक पटकावले. सुरज बंडू कोकरे याने 2 रौप्य पदके,वेदांत वैभव पाटील याने 2 रौप्य पदके तर भक्ती दीपक बंडगर,श्रुतिक दाइंगडे यानी प्रत्येकी 1 रौप्य पदक मिळवले. स्नेहा भोसले हिने 2 कांस्यपदके,शुभम मसाले याने 2 कांस्यपदके तर,भक्ती दिपक बंडगर, प्रज्ज्वल मसाले आणि दक्ष झांबरे यांनी प्रत्येकी 1 कांस्यपदक मिळवले. सर्व खेळाडूंनी आपले क्रीडा कौशल्य दाखवले.स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करीत मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलचे
नावलौकिक उंचावले.मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलच्या यशस्वी खेळाडूंना राष्ट्रीय कराटे प्रशिक्षक आप्पासो तांबे, किरण कचरे व अरुण अब्राहम यांचे मार्गदर्शन लाभले तर संस्थापक मोहन माळी,प्राचार्य डॉ.प्रभाकरन नायर व एडमिनिस्ट्रेटिव सचिन कदम यांचे प्रोत्साहन मिळाले.
कराटे स्पर्धेतील मोहन माळी इंटरनँशनल स्कूलचा चँम्पियन संघ