जत | √ दानम्मादेवी देवस्थान ट्रस्ट निवडणूक | • चंद्रशेखर गोब्बी यांच्या पँनेलचा दणदणीत विजय |

0
Rate Card

दानम्मादेवी देवस्थान विकास पँनेलचा दणदणीत विजय

जत,प्रतिनिधी : कर्नाटक व महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्री.दानम्मादेवी देवस्थान ट्रस्ट गुड्डापूरच्या विश्वस्त मंडळाच्या सन 2019-24 निवडणूकीचा निकाल शुक्रवार ता.5 रोजी लागला.यात जतचे कर सल्लागार चंद्रशेखर गोब्बी यांच्या नेतृत्वाखाली दानम्मादेवी देवस्थान विकास पँनेलच्या सत्ताधारी गटाने निर्विवाद वर्चस्व कायम राखले.पँनेलच्या सर्व सातही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.तर बिजरग्गी,आरबळी यांच्या पँनेला पराभव स्विकारावा लागला.

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी,पुजारी गट – भिमाण्णा अलगोंडा पुजारी,संतोष सोमाण्णा पुजारी (दोघेही रा.गुड्डापूर,बिनविरोध),सर्वसाधारण गट चंद्रशेखर रेवाप्पा गोब्बी(रा.जत,687), प्रकाश शिवाप्पा गणी(रा.तिकोटा,751), बाळासाहेब शंकर गावडे(रा.मिरज,671),सदाशिव षण्मुखप्पा गुड्डोडगी (रा.विजयपूर,747),सिध्दय्या पंचय्या स्वामी(हिरेमठ),(रा.सोलापूर,700)असे विजयी उमेदवार आहेत.विरोधी बिज्जरगी,आरबळी गटाचे गुरूनाथ बिज्जरगी (278),सौ.अश्विनी हत्तरकी(208),संदिप अरबळी(269),सौ.हेमलता तिर्थ (315)मतावर समाधान मानावे लागले.

गत पाच वर्षात सत्ताधारी गटाने केलेल्या सर्वोत्तम कामाची पोहचपावती म्हणून सत्ताधारी गटाच्या पँनेलला भरघोस मतांनी  विजय मिळाला आहे.सर्व विजयी उमेदवारांना चारशेच्या आसपास लिड मिळाले आहे. शासन व देवस्थानच्या उत्पन्नातून ट्रस्टच्या वतीने गेल्या पाच वर्षात भक्त निवास,भक्तासाठी कायमस्वरूपी अन्नछत्र,प्रशस्त दर्शन मंडप,भिमा यात्री निवास आदी कामे करत मोठा कायापालट केला आहे.त्यांच्या या विकास कामाला भक्तांनी विरोध झूगारून चंद्रशेखर गोब्बी यांच्या नेतृत्वाखालील पँनेला मोठे विजय मिळवून देत पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे.

दानम्मादेवी देवस्थान व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी काही कठोर निर्णय घेत मोठा विकास साधला आहे.देवस्थान परिसराचा मोठ्या प्रमाणात कायापालट केला.या कामाची पोहचपावती भक्तांनी दिली आहे. यापुढेही चांगल्या कामातून भक्ताचा विश्वास सार्थ ठरवू. चंद्रशेखर गोब्बी,पँनेल प्रमुख

गुड्डापूर ता.जत येथील श्री.दानम्मादेवी देवस्थान ट्रस्टचे विजयी विश्वस्त मंडळ

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.