डफळापूरात विवाहितेची आत्महत्या

0

Rate Card

डफळापूर,वार्ताहर : येथील 24 वर्षीय विवाहितेने गळपासाने आत्महत्या केली. सुनिता महादेव कोरे (वय-24) रा.डफळापूर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,सुनिता हि आई,व विवाहित भावबरोबर डफळापूर येथे राहत होती.भावाचे स्टँडजवळ केशकर्तनालयाचे दुकान आहे. तिचे संख येथे मुक्त विद्यापीठात पदवीचे शिक्षण सुरू होते.

दरम्यान पंधरा दिवसापुर्वी तिचा अथणी तालुक्यातील वजरहट्टी येथे विवाह झाला होता.दोन दिवसापुर्वी ती आखाड पाळण्यासाठी माहेरी आली होती.गुरूवारी बाजार असल्याने आई बाजार आणण्यासाठी गावात गेल्या होत्या.भाऊ दुकानात होता.सुनीता एकटीच घरात होती.दरम्यान घराचे दोन्ही दरवाजे आतून कडी लावून तुळीला दोरीने गळपास लावून आत्महत्या केली. बाजार करून आई घरी आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.दरवाज्या तोडून सुनीताचा मृत्तदेह बाहेर काढला.दरम्यान सुनीताचे लग्न मनाविरोधात झाल्याने ती निराश होती.त्यातून तिने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.जत पोलीसांनी मृत्तदेह काढून शवविच्छेदनासाठी पाठवला होता.रात्री उशिरापर्यत जत पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.