मुंबई : ग्रामीण भागात तसेच खेड्यापाड्यांमध्ये जनता आणि प्राथमिक किंवा ग्रामीण रुग्णालय यांच्यातील वैद्यकीय सेवेचा दुवा म्हणून काम करणाऱ्या आशा वर्कर्सना आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्यामुळे न्याय मिळाला आहे.आशा वर्कर्सचे मानधन वाढवावे आणि ते किमान 10 हजार रुपये करावे, अशी आग्रही मागणी आमदार श्री. जाधव यांनी काल विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी केली होती. त्यावर उत्तर देताना राज्याचे आरोग्य मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आ.जाधव यांनी केलेली मागणी ही अत्यंत योग्य आहे, असे सांगून आशा वर्कर्सचे मानधन आता आहे.त्याच्या तीन पटीने वाढविण्याचे मान्य केले.
सध्या आदिवासी भागात काम करणाऱ्या आशा वर्कर्सना 3,500 रुपये तर बिगर आदिवासी भागात काम करणाऱ्या काम करणाऱ्या आशा वर्कर्सना 3,000 रुपये मानधन दिले जाते.आता त्यांचे मानधन तीन पटीने वाढणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आशा वर्कर्सना न्याय मिळवून दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत. आहे.याबाबत CITU व महाराष्ट्र आशा, गटप्रवर्तक फेडरेशन यांच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.राज्य अध्यक्षा कॉ.आनंदी अवघडे,राज्य सचिव कॉ. सलिम पटेल,कॉ.विजयाराणी पाटील,कॉ. उज्वला पडलवार,कॉ.नेत्रदिपा पाटील, कॉ.मिना कोळी, कॉ.हणमंत कोळी आदी मान्यवरांनी आ.जाधव यांचे आभार मानले.