जत | डॉ.रविंद्र आरळी फांऊडेशनच्या कराटे पट्टूची इंटरनँशनल स्पर्धेत चमकदार कामगिरी |

0
1

येळवी : जत येथील डॉ.रवींद्र आरळी फांऊडेशच्या कराटे पट्टूनी नेपाळ येथे झालेल्या 5 व्या इंटरनँशनल स्पर्धेत भरघोस यश मिळविले.

त्यात यशराज जगताप व अथर्व चव्हाण यांनी गोल्ड पदक मिळवत चमकदार कामगिरी केली.तर       भाग्यश्री पाटील,प्रतीक कोळी.,अनिरुद्ध शिखरे,युवराज जानकर,श्रवण माळी,यश पट्टणशेट्टी यांनी सिल्वर पदे मिळविली.अमृता भंडारे,रिया तिकोटी,अनिकेत चव्हाण,रोहन तिकोटी,सुदर्शन माळी,शिवाजनली जगताप,धन्या करेनव्वर,तन्मय पवार यांनी ब्रान्झ पदके मिळवित यशस्वी परंपरा कायम ठेवली.यशस्वी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय कोच विजय तिकोटी यांचे मार्गदर्शन,तर फांऊडेशचे संस्थापक डॉ.रवींद्र आरळी व आशा तिकोटी यांचे प्रोत्साहन मिळाले.परवेज गडीकर व विद्याधर किट्टद यांनी विशेष सहकार्य केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नेपाळ येथे चमकदार कामिगिरी केलेला संघ

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here