निगडी खुर्द : येथील टिपूसुलतान शेख यांची नुकत्याच झालेल्या राज्यसेवा परिक्षेत उत्तीर्ण होत,पोलीस उपनिरिक्षक म्हणून निवड झाली.निगडीसारख्या छोट्या गावात प्राथमिक शिक्षण घेतलेले टिपू यांनी मोठे यश संपादन केले आहे.जत येथील माध्यमिक, उच्चमाध्यमिक शिक्षण पुर्ण करून टिपूसुलतान यांनी स्पर्धा परिक्षेचा कसून अभ्यास केला,त्याला यश आले असून ग्रामीण भागातील मुलासमोर टिपूसुलतान आदर्श ठेवला आहे.अभ्यासात सातत्य व प्रचंड कष्ठ करण्याची महत्वकांक्षा कोणतेही यश मिळवून देते,त्यामुळे प्रथमपासून ध्येय निश्चित करून प्रयत्न केला.असे टिपूसुलतान शेख यांनी निवडी नंतर बोलताना सांगितले.