जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेहणार्या तरुणास मोर्बे (ता. पनवेल जि. रायगड) या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे. तानाजी कृष्णा निळे (वय 21, रा. लकडेवाडी) असे या तरुणाचे नाव आहे. गेल्या महिन्यात दि.13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता कुंभारी येथून मुलीस पळवून नेहण्यात आले होते.याबाबत जत पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी फिर्याद दाखल केली होती
दरम्यान,बुधवारी जत न्यायालयात तानाजी निळे याला हजर केले असता त्याला दि. 8 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या सूचनेनुसार व जतचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रणजीत गुंडरे व सहकारी कर्मचारी संदीप नलावडे, महिला पोलिस वाहिदा मुजावर यांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने अनेक ठिकाणी त्यांचा शोध घेतला.मंगळवारी दि. 5 मार्च रोजी मोर्बे, ता. पनवेल या ठिकाणाहून तानाजी निळे व पीडित मुलीस ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत जत पोलीस ठाण्यात तानाजी याच्याविरोधात अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेहल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आज न्यायालयासमोर उभे केले असता 8 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.