तालुकाभर अवैद्य धंद्याना उधान,पोलीस गांधारीच्या भुमिकेत:सर्वच धंदे जोमात
जत,प्रतिनिधी : जत व उमदी पोलीस ठाण्याच्या आशिर्वादाने परिसरात अवैध धंद्यांना ऊत आला आहे.गुंडाराज,अवैध दारू,मटका,सिंदी,जुगार,बेकायदा वाहतूक यासारखे अवैध धंदे खुलेआम सुरु असून याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखानी लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरीकातून होत आहे.जत,उमदी परिसरातील अनेक गावे सांगली पासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहेत.त्यामुळे या परिसरात नेमके काय चालते हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बहुधा माहिती नसते.त्याचा गैरफायदा येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी घेत आहेत.जत व उमदी पोलिस ठाणे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबादीत राखण्यासाठी या पोलिसांची नेमणूक शासनाने केली आहे.मात्र याकडे लक्ष न देता येथील अधिकारी व पोलिसांनी ‘ मलिद्या ‘ साठी चांगलाच राबता हंगामा सुरु केला आहे. त्यातून महिन्याकाठी लाखो रुपयांची मलिदा गोळा होत आहे.त्याच्या बदल्यात अवैद्य धंद्यांना एकप्रकारे परवानाच दिल्याची स्थिती आहे.
हेही वाचा ;
जत | परशूराम मोरेच्या टीमची दिवाळी गोरगरिबांसोबत साजरी |
मटका जोमात :
जत व उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावात मटका जोमात सूरु आहे दररोज लाखो रुपयांची उलाढाल या मटक्यातून होत आहे.दोन्ही पोलीस ठाण्यातील एक,एक पोलीस कर्मचारी या मटक्यावर चांगलेच नियंत्रण ठेवून आहेत.या मटक्या बुकी कडून महीन्याकाठी ठरलेली मलिदा वेळेत वसूल होत असलेने कारवाई करण्यास उमदी पोलिसाकडून टाळाटाळ होत आहे .
दारू शिंदीचा उंच्छाक:दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटक्याबरोबर हातभट्टी दारू बनावट,पावडर युक्त शिंदीच्या विक्रीने उंच्छाक मांडला आहे .यातून देखील लाखो रुपयांची मलिदा गोळा होत आहे
हेही वाचा ;
कुडणूर | खूनप्रकरण : तपास जैसेथे | पोलिसांना आरोपी सापडेना : उलटसुलट चर्चा
बंद मटका जोमात :आघाडी शासनाच्या काळात उमदी परिसरात मटका सुरु झाला की लगेच कारवाई व्हायची आता मात्र; उमदी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह सर्वच पोलीस कर्मचारी मूग गिळून गप्प आहेत .याकडे पोलीस प्रमुखानी वेळीच लक्ष देवून या लाचखोर पोलिसांचा भांडाफोड़ करावी अशी मागणी परिसरातून होत आहे.
बेकायदा वाहतूक सुसाट : बेकायदेशीर वाहतूक रोकणारे पोलीस हप्ते वसूलीत व्यक्त असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेचे बारा वाजले आहे.हप्तेबाजीने बेकायदा वडाप वाहतून सुसाट सुरू आहे. जनावरांसारखी माणसे कोंबून वडाप होत आहे. हे रोकण्यासाठी नेमलेले कर्मचारी दररोज हाजारो रूपये गोळा करत असल्याचे बेधडक आरोप होत आहेत.
पोलीस निरिक्षक अनभिन्न जतला नव्याने आलेले पोलीस निरिक्षक भंवड हे याबाबतीत अनभिन्न असल्याचे कळते,त्यांनी सर्व अवैद्य धंदे बंद करा असे आदेश पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्याचे कळतंय.मात्र साहेबांची लवकरचं बदली होण्याची शक्यता असल्याने ते फार इच्छूंक नाहीत.त्यामुळे कर्मचाऱ्याचे फावले आहे.