जत | परशूराम मोरेच्या टीमची दिवाळी गोरगरिबांसोबत साजरी |

0
1

जागर फांऊडेशचे समाजहिताचे  कार्य अंखड सुरू

जत,प्रतिनिधी : जतच्या इतिहासात मोठी स्वच्छता मोहिम  राबविलेले जागर फौंडेशनचे सामाजिक कार्य अखंडित सुरू आहे. दिवाळीतही त्यांनी समाजसेवेची बांधिलकी शहरातील गौरगरिबं नागरिकासमवेत दिवाळी साजरी केली.हातावर पोट असणाऱ्या गोलार वस्तीत दिवाळीच्या शुभेच्छा देत फराळाचे वाटप केले.

आमच्या फेसबुक पेजला भेट द्या

जत शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या जागर फांऊडेशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक  परशुराम मोरे यांची टीम सदैव समाजहितासाठी काम करत आहे.फाउंडेशनच्या कार्यक्रर्त्यांनी शहरात  राबविलेली अंखड 75 दिवसाची स्वच्छता मोहिम अनेकांचा डोळ्यात अंजन घालणारी ठरली होती.माणूसकीची भिंत,रस्त्यावर मुरूम टाकणे,गरजूंना मदत,स्वखर्चातून नळपाणी पुरवठ्याची कामे करून पशूराम मोरे व टीमने शहरात  नावलौकिंक मिळवला आहे.शहरातील जेथे दिवाळी साजरी करणे शक्य नाही अशा गोलार  गल्लीतील  नागरिंकात मोरे व टीमने दिवाळी साजरी केली.

 हेही वाचा ;

कालकथित अर्थव सांगलीकर यांच्या जन्मदिनानिमित्त सोमवारी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

 त्यांना फराळाचे वाटप करत आंनदोउत्सोव साजरा केला.यावेळी उपाध्यक्ष अमोल कुलकर्णी, सिध्देश्वर जाधव,विकास बनपट्टे,आनंद कोकळे,लखन देशमुख, बालाजी शिंदे,अबिद हुजरे,बापू सूर्यवंशी,लखन पाथरूट,आकाश पाथरूट,सागर चालक,आनंद कांबळे,अमोल पवार,संदिप जाधव,बाळू कांबळे,आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजाचे तळागाळातील नागरिकांना प्रवाहात आणणे,त्यांच्या जिवनात आनंद निर्माण करण्यासाठी सदैव आम्ही कार्यरत राहु असे यावेळी मोरे यांनी सांगितले.

  1. जागर फाउंडेशनच्या वतीने गोलार गल्लीतील सामान्य नागरिकांसोबत दिवाळी साजरी करत साहित्य वाटप केले

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here