चालत्या ट्रकचे फाळके तुडल्याने लोंखडी पत्र्याचे बंडल रस्त्यावर सुदैवाने जिवित हानी टळली : ओहरलोड वाहतूक पुन्हा चव्हाट्यावर

0

चालत्या ट्रकचे फाळके तुडल्याने लोंखडी पत्र्याचे बंडल रस्त्यावर

सुदैवाने जिवित हानी टळली : ओहरलोड वाहतूक पुन्हा चव्हाट्यावर

उमदी,वार्ताहर:विजापुर -पंढरपुर महामार्गावर उमदी (ता.जत)नजिकच्या पेट्रोल पंपाजवळ स्टीलपत्र्याचे बंडल घेऊन जाणाऱ्या चालत्या ट्रकचे (क्र.MH 25, U 3996) रस्त्यावरच डाव्या बाजूचे लाकडी फळके तुटुन ट्रकमधील पत्र्याचे बंडल रस्त्यावर पडल्याने ट्रक पलटी होता होता वाचला,मात्र ट्रकमधून काही स्टिलचे रोल रस्त्यावर विकुरले होते.सुदैवाने ट्रकच्या मागे कोणतेही वाहन नसल्याने जिवित हानी टळली.

अपघातानंतर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.या घटनेची नोंद उमदी पोलिसात झाली आहे.हा अपघात जर बसस्थानक परिसरात झाला असता तर मोठी जीवित हानी झाली असती. विजापुर-पंढरपूर या मार्गावर कालबाह्य अवजड वाहनातून ओव्हर लोड वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू असते.याला कुणाचा कृपा आर्शिवाद आहे,हे वेगळे सांगायची गरज नाही.

या रस्त्यावर एक ही टोल किंवा तपासणीचे सक्षम केंद्र नसल्याने व चोरटी मालवाहतूक मोठ्या प्रमाणात चालू असते. ही जिवघेणी वाहतूक रोखण्याचे धाडस उमदी पोलिसांकडून झाल्याचे दिसत नाही.त्यामुळे दररोज या मार्गावर नियम धाब्यावर बसवून हजारो वाहने जिवघेणी ये- जा करीत अाहेत.याचा विचार करुन संबधित अधिकाऱ्यानी वेळीच लक्ष घालावे अशी मागणी जनतेतून होत आहे.

Rate Card

चेक पोस्ट नव्हे वसूली पोस्ट

उमदी पोलीस ठाणे अंतर्गत कों.बोबलाद (ता.जत)येथे आंतरराज्यीय चेकपोस्ट आहे.येथे चोरटी व ओव्हरलोड वाहतूक रोखण्यासाठी दोन पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. पण येथील पोलीस चिरीमिरी मिळत असल्याने या ओव्हरलोड वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत आहेत. असा ग्रामस्थाचा आरोप आहे.

कोट
उमदी पोलिसाच्या अकार्यक्षमतेमुळे पुन्हा एकदा मोठी जिवित हानी होताहोत टळली. अशा वाहनाची यापुर्वी कधीही तपासणी झाली नसल्यानेच अशा कालबाह्य वाहनातून ओहरलोड वाहतूक राजरोस सुरू आहे. येथे पोलिस कारवाईची शासकीय पावती नसते. तेथे फक्त काही हाजाराचा हप्ता विनायास दिला जात असल्यानेच उमदी पोलिसाच्या कानडोळा आहे. असा आरोप होत आहे. दुसरीकडे एकादे प्रवाशी वाहन चुकून उमदी हद्दीतील तपासणी पथकाला सापडले तर मात्र शासकीय नियम लावत दोन हाजाराच्या दंडाची पावती फाडली जाते. दुसरीकडे जिवघेणी ठरणाऱ्या वाहनांना अभय दिले जाते हे विशेष…

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.