संख ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी

0

संख ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी 

Rate Card

 संख,वार्ताहर:  संख (ता.जत)येथील ग्रामपंचायत निवडणूक रंगतदार व दुरंगी होण्याची शक्यता आहे. जनसुराज्य विरूध भाजपा,कॉग्रेस व शेतकरी संघटना प्रणित आघाडी अशी लढत अपेक्षित आहे. ऐनवेळी भाजपमधून आघाडी केल्याने थेट संरपच पदासाठी तयारी केलेले अनेक जण नाराज असल्याची चर्चा आहे. गत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत भाजपकडून जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारांना तुल्यबंळ लढत देऊन विजय मिळविले आहेत. त्यामुळे भाजपची ताकत वाढली होती. त्या धर्तीवर काहीजण थेट संरपच पदासाठी उतरणार होते. मात्र ऐनवेळी भाजपने कॉग्रेस,शेतकरी संघटनेशी हात मिळविनी करून आघाडी केली आहे. संरपच पदासाठी शेतकरी संघटनेच्या उमेदवार पुढे येऊ शकतो. अशी चर्चा आहे. ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या जनसुराज्य पक्षाची निर्विवाद सत्ता आहे. त्या सत्तेला शह देण्यासाठी भाजपचे माजी सभापती आर. के. पाटील तुल्यबंळ पॅनेलची तयारी करत आहेत. भाजपाला वाढलेला जनाधार त्यांच्या विजय सुकर करेल अशी स्थिती आहे. तर स्थानिक सोसायटी व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत झालेल्या पराभवामुळे बसवराज पाटील प्रंचड सक्रीय झाले आहेत. कोणत्याही परिस्थिती ‘ग्रामपंचायतीवर आपल्याच गटाची सत्ता रहावी यासाठी सवत्तोपरी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे आपल्या ताकतीचा अंदाज घेऊन कॉग्रेस व शेतकरी संघटने कडून भाजपशी आघाडी केली आहे. त्यांच्या काही समर्थांना सदस्य पदासाठी मैदानात उतरले जाणार आहे. थेट संरपच पदासाठी भाजपचे काही नेते व शेतकरी संघटनेचा एकजण इच्छूक आहे. अतिंम निर्णय अद्याप झाला नाही. दरम्यान आघाडी व सत्ताधारी गटात रुसवे फुगवे काढावे लागणार आहेत.जत नंतर सर्वात मोठे गाव असणाऱ्यां संखची निवडणूक लक्षवेधी होणार आहे. आतापर्यत राजकीय प्रतिष्ठा यात दोन्ही गटाच्या नेत्यांना अजमावावी लागणार आहे. दरम्यान अर्ज माघारी नंतरच दोन्ही गटाचे निर्णय कळणार आहेत.इच्छूक निवडणूक लढवायची म्हणून प्रचाराला लागले आहेत. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.