हुस… अर्ज भरण्याचे अग्निपरीक्षा संपली. शेवटच्या दिवशी तुफान गर्दी ; वेळ वाढविल्याने अर्ज वाढले

0

हुस… अर्ज भरण्याची अग्निपरीक्षा संपली.

शेवटच्या दिवशी तुफान गर्दी ; वेळ वाढविल्याने अर्ज वाढले

जत, प्रतिनिधी : तालुक्यातील 81 ग्रामपंचायत निवडणुकीस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी शेवटच्या तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी झाली. तालुक्यांतून —- अर्ज दाखल झाले. सरपंचपदासाठी —तर सदस्यपदांसाठी —-अर्ज आले.शुक्रवार, दि. 29 रोजी शेवटचा दिवस होता. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली होती.दरम्यान निवडणूक आयोगाने शेवटच्या दिवशीची सर्व्हर डाऊनचा फटका उमेदवारांना बसू नये यासाठी अर्ज स्विकारण्याची वेळ 4.30 ची 6.30 केल्याने यंत्रणेवरचा भार काहीअंशी हलका झाला. अनेक ठिकाणी निवडणूक अधिकारी, कर्मचारी रात्री उशिरापर्यंत थांबून प्रक्रिया पूर्ण केली. शेवटच्या दिवशीची गर्दी लक्षात घेता योग्य नियोजन केल्याने नियत्रंण ठेवता आले. शेवटच्या दिवशी ताण वाढल्याने दिवसभरात अनेक वेळा ऑनलाईन सर्व्हर बंद पडला. काही इच्छूक अर्ज भरू शकले नसल्याचे चित्र आहे.अनेक ठिकाणी ऑनलाईन यंत्रणा वारंवार बंद पडत होती. यामुळे उमेदवार व निवडणूक कर्मचार्‍यांना मनस्ताप होत होता.  कागदपत्रे गोळा करण्यासाठी उमेदवारांना त्रास झाला. एंकदरीत अर्ज भरण्याचे विघ्न एकदाचे पार पडल्याचे समाधान प्रशासनावर होते.दरम्यान काही उमेदवारांना अडचणी आल्याने किरकोळ तक्रारी झाल्या.

Rate Card

जत:तालुक्यातील ग्रामपंचायत निवडनूकीत अर्ज भरण्यासाठी लागलेली रांग

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.