नगरपालिकेत विकास कामात मोठा भष्ट्राचार संजय कांबळे, शिवाजीराव ताड
नगरपालिकेत विकास कामात मोठा भष्ट्राचार
संजय कांबळे, शिवाजीराव ताड
जत,प्रतिनिधी : जत शहरातील विविध योजनातील भष्ट्राचाराचा पर्दापाश करत शहरातील अनेक कामाचे पोस्टमार्टम करून शहराला मागे ठेवणाऱ्या मतलबी नगराध्यक्ष, नगरसेवक व अधिकारी यांच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी आरपीआयचे संजय कांबळे, शिवाजीराव ताड यांनी केली.
गेल्या वर्षी कार्यभार स्विकारलेल्या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना हाताशी धरत कोट्यावधीचा घफला केला आहे. रस्ते बांधकाम, स्वच्छता अभियांन,संडास बांधकाम, झेराक्स मशिनमध्ये मोठा घोळ केल्याचा आरोप उपस्थितीनी केला.झेराक्स मशिन घेताना जादा बिल दाखवून 1 लाखाचा भष्ट्राचार केला.गुंठेवारीचा ना हारकत दाखल्यासाठी पैशाशिवाय कागद हलत नाही.शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात मोठा भष्ट्राचार झाल्याचा आरोप केले. यातही एकाच घरात अनेक शौचालये देण्यात आली आहेत.बाजार भावापेक्षा जादा मुल्यांकन दाखवून लाखोचा भष्ट्राचार केला आहे. काही बिले व्यक्तिगत लाभार्थ्यां ऐवजी एकाच संस्थेच्या नावाने काढले आहेत.कचरा उचलण्यासाठी 300 किलोमीटर वरील पाचगणीच्या ठेकेदारास वैयक्तिक फायद्यासाठी दिला. योजनेची माहिती अधिकार खाली मागितलेली माहिती दिली जात नाही. यातही भष्ट्राचार उघड होईल या भितीने टाळाटाळ केली जात असल्याचे आरोप कांबळे, ताड यांनी केले.
यावेळी आमदार विलासराव जगताप, डॉ. रविंद्र आरळी, अॅड. प्रभाकर जाधव,शिवाजीराव ताड,चंद्रकांत गुड्डोडगी, आरपीआयचे संजय कांबळे, सरदार पाटील, सुनिल पवार आदि मान्यवर उपस्थित होते.