लाखो भक्ताच्या नवसाला पावणारी जत श्री. यल्लम्मा (रेणूका) देवी

0

लाखो भक्ताच्या नवसाला पावणारी जत श्री. यल्लम्मा (रेणूका) देवी

श्री. यल्लाम्मा देवीची सौदत्ती,कोकूटनूर मध्ये जशी प्रसिध्द मंदिरे आहेत. तसेच जत मधील श्री. यल्लम्मा देवी(रेणूका)मंदिर महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.डफळे राज घराण्याचे पुर्वज सौंदत्ती यल्लम्मा देवीचे भक्त होते.प्रत्येक अमावस्येला ते सौंदत्ती श्री. यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन परत येत होते. ते वयोवृध्द झाले तेव्हा त्यांनी भक्ती भावाने देवीची प्रार्थना करत तुच आता जतला ये व आम्हाला तुझी सेवा करण्याची संधी दे असे देवीसमोर मागणे घातले.आपल्या भक्ताची प्रार्थना ऐकून देवीने स्वप्नामध्ये दृष्टांत दिला मी तुझा मागोमाग अदृष़्य स्वरूपात जतला येईन.पंरतू काही केल्या तु पाठिमागे बघायचे नाही.राजाने मोठ्या आंनदाने श्री. यल्लम्मा देवीला सौंदत्ती हून जतला आणण्यासाठी मनोभावे प्रार्थना करू सजवलेली पालखी उचचली.कोकूटनूर गावात आले असताना अचानक मोठा आवाज झाला.व प्रकाश पडला.त्यावेळी राजाने पाठीमागे वळून पाहिल़्याने देवी अदृष़्य झाली. राजाने पुन्हा अंत:करणपुर्वक म्फी मागितली. व जत येण्याची प्रार्थना केली. कोकूटनूर येथेही राजाने मंदिर बांधले.तेथून पुढे जत येथील गावाच्या दक्षिणेस गंधर्व नदी किनाऱ्यावर पुर्वाभिमुख दरावाजा असलेले श्री. यल्लम्मा देवीचे मंदिर बांधले अशा या नवसाला पावणारी देवीची यात्रा महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. यात्रा काळात दहा लाखावर भाविक दर्शन घेतात. आमवेस्येला मोठ्या भाविक येतात.नवरात्र काळातही येथे नवरात्र उत्सव साजरा होतो.घटस्थापना करून मंदिराला विद्युलरोषणाई केली जाते. डफळे संस्थानचे खाजगी देवस्थान त्रस्ट मार्फत चालविले जाते. मदिंर परिसरात मोठी विकास केला आहे. अजूनही कामे सुरू आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक, आध्रंप्रदेशांतील लाखो भाविकाचे श्रंध्दास्थान म्हणून यल्लम्मा देवीचा नावलौकिक आहे. जत शहरासह तालुक्यातील भाविक नवरात्र काळात मोठ्या संख्येने देवीचे दर्शन घेतात.

  संकलन : पुंडलिक बाळू पांढरे, जत

Rate Card

yellamma devi साठी प्रतिमा परिणाम

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.