मालमत्ता, गुन्हे, अपत्ये बाबत नोटरी,किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या समोरचे घोषणापत्र आवश्यक तहसिलदार अभिजित पाटील
मालमत्ता, गुन्हे, अपत्ये बाबत नोटरी,किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या समोरचे घोषणापत्र आवश्यक
तहसिलदार अभिजित पाटील
जत, प्रतिनिधी : जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक अर्ज सादर करण्यासाठी स्वतंत्र घोषणापत्र सादर करणे गरजेचे आहे. मालमत्ता, गुन्हे, अपत्ये दंडाधिकारी चे अभिसांक्षाकनाची गरज असल्याची माहिती तहसिलदार अभिजित पाटील यांनी दिली. ते म्हणाले,प्रतिज्ञापत्र, घोषणापत्र, स्वंय: घोषणापत्र हे तीन वेगवेगळे दस्तऐवज आहेत. स्वयंघोषणापत्र जे शौचालय साठी लागते ते फक्त सदर उमेदवारांने करायचे आहे. ते व इतर स्वयंघोषणापत्रला कार्यकारी दंडाधिकारीच्या अभिसांक्षाकनाची गरज नाही. पण मालमत्ता, गुन्हे, अपत्ये याबाबत मात्र नोटरी,किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या समोर करणे कायदेशीर व आवश्यक आहे