शहीद अजितवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पाणवलेल्या डोळ्यांनी निरोप : लष्कर,पोलिस दलाची मानवंदना
शहीद अजितवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पाणवलेल्या डोळ्यांनी निरोप : लष्कर,पोलिस दलाची मानवंदना
जत,प्रतिनिधी : निगडी खुर्द ता.जत येथील शहीद जवान अजित नारायण काशिद (वय-23) यांच्यावर त्यांच्या मुळ गावी शौकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.सैन्य व पोलिस दलांनी बंदूकीच्या फैरी झाडून अखेरची मानवंदना दिली.शहीद जवान अमर रहेच्या घोषणा देत उपस्थित सुमारे पाच हाजार नागरिकानी त्यांना साश्रू नयनांनी निरोप दिला.भारत- चिन सिमेवर डोकलाम येथे सेवा बजावत असताना जवान अजित यांचा भिषण अपघात झाला होता. त्यांत उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मावळली होती युध्दभूमीवर तैनात असताना त्यांचा मृत्यू झाल्याने

सैन्य दलाकडून त्यांना शहीद घोषित केले. शहीद अजित काशिद यांचे पार्थिव पहाटे जतमध्ये आणण्यात आले.काही वेळ पार्थिव पोलिस स्टेशन मध्ये ठेवण्यात आले. सकाळी आठच्या दरम्यान निगडी खुर्द येथे सेनादलाच्या रुग्णवाहिकेतून आणण्यात आले.सुकामा येथील इंजिनिअरिंग रेजमेंटचे सुभेदार संजय पाटील, हणमंत काळे,व अन्य शिपाई पार्थीव घेऊन आले होते. सुरूवातीला ग्रामपंचायत कार्यालया समोर अजित काशिद यांचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.त्यावेळी पंचक्रोशीतील अंसख्य नागरिकांनी अतिंम दर्शन घेऊन पुष्पहार वाहिले.फुलानी सजलेल्या ट्रालीमधून शहीद अजित काशिद यांची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली.त्यांनतर ही अत्यंयात्रा काशिदवाडी येथे आली.काशिद यांचे पार्थिव त्यांच्या घरी कुटुंबीयाच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले. अजित यांचे पार्थिव येताच अजित यांची आई चिंगुबाई,वडील नारायण,भाऊ सुनिल,व नातलगांनी हभरडा फोडला. तेथील आक्रोश पाहून उपस्थितीताचेही डोळे पाणावले.शहीद काशिद यांच्या पार्थिवावर निगडी खुर्द येथील त्यांच्या काशिदवाडी येथील शेतात बुधवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पुर्वी जतचे आमदार विलासराव जगताप, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, जिल्हाधिकारी विजय काळम पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. गोडबोले, जिल्हा पोलिस प्रमुख दत्ताञय शिंदे,प्रांताधिकारी शंकरराव बर्गे, तहसिलदार अभिजित पाटील,डिवायएसपी नागनाथ वाकुर्डे, पोलिस निरिक्षक राजु तासिलदार, सह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार जगताप, जिल्हाअधिकारी कळमपाटील, जिल्हा पोलिस प्रमुख शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यांनतर सेनादलाचे कोल्हापूर येथील जवान व सांगली पोलिस दलाने बंदूकीच्या 21 फैरी झाडून शहीद अजित काशिद यांना सलामी दिली.शहीद काशिद यांचे बंन्धू सुनिल यांनी पार्थिवास मंत्राग्नी दिला.शहीद अजित हे पश्चिम बंगालमधील सुकामा येथील सैन्यदलात इंजिनिअरिंग रेजमेंटमध्ये कार्यरत होते.चिन सिमेवर ता.17 सप्टेंबरला डोकलाम मधील सेक्टर कुपुक याठिकाणी त्यांच्या वाहनाचा भिषण अपघात झाला,त्यात अजित गंभीर जखमी झाले होते. दार्जिलिंग जिल्ह्यातील बागडोगरा येथील सैन्यदलाच्या बेस हॉस्पीटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना अजित यांनी अखेरचा श्वास घेतला. सैन्यदलात कार्यरत असताना अजित यांचा अपघात झाल्याने सैन्यदलाने अजित यांना शहीद घोषित केले आहे.