राजारामबापू साखर कारखाना वार्षिक सभा बातमी व फोटो
इस्लामपूर,प्रतिनिधी:आपण ऊसाची कोणतीही इतर विल्हेवाट न करता आपल्या तिन्ही युनिटमध्ये 20 लाख मे.टन ऊसाचे गाळप करून ऊस दराची चिंता माझ्यावर सोडा,असा विश्वास माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी सभासदांना दिला. यावेळी त्यांनी सभासदांना 2 रुपये दराने महिन्याला दिल्या जाणाऱ्या 5 किलो साखरेत वाढ करण्याची सूचनाही संचालक मंडळास केली.
राजारामबापू पाटील सह.साखर कारखान्याच्या 48 व्या वार्षिक सर्व साधारण सभेत आ.पाटील बोलत होते. चेअरमन पी.आर.पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

आ.पाटील पुढे म्हणाले,केंद्र शासनास ऊस उत्पादक शेतकऱ्यापेक्षा ग्राहकाचे हित जोपासणे महत्वाचे वाटते. साखरेचे दर वाढले,तर महागाई वाढेल,असा त्यांचा गैरसमज आहे. आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे जादा देता यावेत,म्हणून कारखान्याच्या विजेस चांगला दर दिला. मात्र या सरकारने करारच बंद केल्याने कारखाने अडचणीत आले आहेत.
पी.आर.पाटील म्हणाले,गेल्या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे साखर टंचाई होवून साखरेस चांगला दर मिळेल असे सर्वाना वाटत होते. मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे साखरेचे दर खाली आले आहेत. शासनाने इथेनॉलचे दरही कमी केल्याने फटका बसला आहे.यावर्षी आपणास साखराळे युनिटमध्ये 10 वाटेगाव- सुरूल युनिटमध्ये साडेपाच लाख तर कारंदवाडी युनिटमध्ये साडेचार लाख मे.टन गाळप करायचे आहे. विश्वनाथ पाटसुते यांनी सुत्रसंचलन केले.