जतेत स्वाईन प्लूचा रुग्ण आढळला
जतेत स्वाईन प्लूचा रुग्ण आढळला
शहरातील एका डॉक्टराच्या थुंकीच्या तपासणीत विषाणूची लागन : ग्रामीण रुग्णालयात स्वाईन प्लू कक्ष स्थापन
जत,प्रतिनिधी:जत शहरातील एका प्रतिथयश डॉक्टरांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरात खळबंळ माजली आहे. दरम्यान आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जत ग्रामीण रुग्णालयात स्वाईन फ्लू कक्ष उघडण्यात आला आहे.सर्वत्र स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. सांगली जिल्ह्यात या साथीने अनेकाचा बळी घेतला आहे.आता जत तालुक्यात स्वाईन फ्लूचा पहिलाच रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा गतीने कामाला लागली आहे.
जत -विजापूर रस्त्यावरील एका प्रसिध्द डॉक्टरांना सर्दी खोकला व घशाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी खाजगी प्रयोग शाळेमध्ये तपासणीसाठी नमुणे पाठविले होते. सदर तपासणीत त्यांच्या थुंकीमध्ये स्वाईन फ्लूचे विषाणू आढळून आले आहेत. त्यामुळे शहरासह तालुक्यात खळबंळ माजली आहे.

दरम्यान जत ग्रामीण रुग्णालयात स्वाईन फ्लू कक्षाची स्थापना केली आहे. तेथे तपासण्या व औषध उपचाराची सुविधा असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी जी पवार यांनी दिली.
डॉ. पवार यांनी जत शहरात स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळून आल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. तसेच स्वाईन फ्लूची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ रुग्णालयात संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. स्वाईन फ्लूची लागन झालेल्या डॉक्टरांनी उपचार घेतले असून त्यांची प्रकृत्ती व्यवस्थित आहे. घरीच त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं कळतयं