जतेतील निवडणूक यंत्रणेला जिल्हाअधिकारी कळमपाटील यांनी भेट देत आढावा घेतला
जतेतील निवडणूक यंत्रणेला जिल्हाअधिकारी कळमपाटील यांनी भेट देत आढावा घेतला
जत,प्रतिनिधी :जत तालुक्यातील ‘ग्रामपंचायती निवडणूकीच्या यंत्रणेला जिल्हाअधिकारी विजय काळम पाटील यांनी भेट देत आढावा घेतला.सेतू कार्यालयाचीही पाहणी केली.

तहसिल कार्यालय समोरिल गोडावून मध्ये अर्ज दाखल करण्यासाठी केलेली रचना अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीची मोठी गर्दीत अडचणीची ठरू शकते त्यामुळे गोडावून मधील रचना बदलून बाहेर प्रशस्त जागेत करावी अशी सुचना तालुका निवडणूक अधिकाऱ्यांना दिली. सेतू कार्यालयात जाऊन पाहणी केली. सर्व दाखले शासकीय दराप्रमाणे वेळेत दिले जातात का यांची पाहणी केली. उपस्थित नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या,सेतू चालकांना कोणत्याही परिस्थितीत अडवणूक करू नका,जादा पैसे घेऊ नका,तक्रार आल्यास कारवाईच होईल असे सांगितले. यापुर्वी सेतू कार्यालयाच्या भेटी प्रंसगी दिलेल्या सुचनाची अमलबंजावली झाली आहे का? यांचीही माहिती जिल्हाअधिकारी कळमपाटील यांनी घेतली. दरम्यान जिल्हाधिकारी स्वत: सेतू कार्यालय,निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतल्याने सेतूतील यंत्रणेत गती आली आहे. त्यामुळे जिल्हाअधिकारी कळमपाटील यांच्या बद्दल समाधान व्यक्त होत आहे.
जत: जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकी पाश्वभमीवर जत सेतू कार्यालया कडून जातीसह अन्य दाखले व अन्य अडचणीचा जिल्हाअधिकारी कळमपाटील थेट नागरिकांशी संवाद साधत सुचना दिल्या.