डफळापूर ग्रामपंचायत निवडणूक; संरपच पदाच्या उमेदवार घोषणेवर समिकरणे अवलंबून

0

डफळापूर ग्रामपंचायत निवडणूक; संरपच पदाच्या उमेदवार घोषणेवर समिकरणे अवलंबून

डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ग्रामपंचायत निवडणूकीचा रणागंण तापले आहे. गत पाच वर्षातील सत्ताधारी व विरोधी गटाकडून तुल्यबंळ लढतीसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. तालुक्यातील महत्वाचे गाव असणाऱ्यां डफळापूरवर सत्ता मिळविण्यासाठी तुल्यबंळ उमेदवार उतर

विण्याची तयारी सुरू आहे.

बहुजन विकास क्रांती पँनेल मधून मन्सूर खतीब, साहेबराव गायकवाड,विलास माने, प्रा. बि. आर.पाटील,सज्जनराव चव्हाण, संभाजी माळी, जेके माळी,शंकरराव गायकवाड आदि मान्यवर तुल्यबंळ उमेदवार उतरविण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

Rate Card

तर दुसरीकडे कॉग्रेसकडून तगडी फाईट देण्यासाठी तेवढ्याच ताकतीचे उमेदवार मैदानात उतरवले जाणार आहेत. कॉग्रेसच्या पॅनेलसाठी अभिजित चव्हाण, दिग्विजय चव्हाण,मनोहर भोसले,बाबासाहेब माळी, पोपटराव पुकळे,ए. एन. खतीब आदि प्रयत्न करत आहेत.

दरम्यान संरपच पदासाठी नेमके उमेदवार अद्याप निश्चित नाहीत. क्रांती बहुजन पॅनेलकडून परशूराम चव्हाण यांच्या आई, बाजार समितीचे माजी संचालक विलास माने यांच्या पत्नी यांची नावे चर्चेत आहेत.ऐनवेळी संभाजी माळी यांच्या कुटुंबातील उमेदवार पुढे येऊ शकतो.

तर कॉग्रेसकडून सोसायटीचे पंचवीस वर्षे चेअरमन असलेले मनोहर भोसले यांच्या पत्नी,जयराज शिंदे यांच्या पत्नी,बाळासाहेब चव्हाण यांच्या पत्नी, अभिजित चव्हाण यांच्या पत्नी इच्छूक आहेत. त्यामुळे अद्याप नावे निश्चित नसल्याने नेमके उमेदवार कोन असणार यावर बरीच समिकरणे अवलंबून आहेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.