“लागीर झालं जीला” डॉ. आरळीच्या कन्येंचा सुरेल आवाज “मन मोहरलं”ह्या झी मराठीवरील गाण्यानं जतच्या डॉ.ऋतुजा आरळी टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण
“लागीर झालं जीला” डॉ. आरळीच्या कन्येचं संगीत
“मन मोहरलं”ह्या झी मराठीवरील गाण्यानं जतच्या डॉ.ऋतुजा आरळी टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण

जत,प्रतिनिधी : सध्या महाराष्ट्रातील घरा घरात झी मराठीवरील “लागीर झालं जी” ही मालिका गाजत आहे. मालिका चर्चेत येण्याला आणखिन एक कारण तितकेच महत्वाचे ठरत आहे. ते एका गाण्यामुळे 13 संप्टेबरच्या भागामध्ये “मन मोहरलं” शितलीवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. हे गाणं तयार केलयं सांगलीच्या 3 तरूण मुंलानी,सागर बाबनगर यांनी रचलेल्या या गाण्याला संगीताचा साज अभिमन्यू कार्लेकर यांनी दिलायं, तर जतच्या प्रसिध्द डॉ. रविंद्र आरळी यांच्या कन्या डॉ.ऋतुजा आरळी व अभिमन्यूच्यां मंत्रमुग्ध आवाजाने 6 लाखावर लोकांना घायाळ केले आहे. हे गाणं तयार करताना तिंघाची मेहनत कामी आली आहे. अभिमन्यूचं मंत्रमुग्ध संगीत,ऋतुजाचा मनमोहक आवाज आणि सागरचे ह्रदयाला स्पर्श करणारे शब्दं असा सुरेश संगम “लागीर झालं जीला” साज दिला आहे. ते तुम्हालाही नक्की आवडेल.या गाण्यामध्ये साम्युअल मोरे यांनी तालवाद्य तर डॉ. मनाली रानडे हिने उत्कृष्ठ बासरी वादन केलेलं आहे.
सध्या या गाणं महाराष्ट्रात चांगलाच धुमाकूळ घालत आहे.6 लाखा पेक्षा जास्त लोंकानी यु ट्युबवर हा व्हिडिओ पाहिला आहे. आणि 10 हाजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. नाट्यपंढरी असलेल्या सांगलीच्या या तीन तरूण मुलांनी मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात आपल्या कृतृत्वाचां वेगळा ठसा उमटविला आहे. त्यात जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील बडे प्रस्थ असणाऱ्या जतच्या डॉ. आरळीच्या कन्येचा सहभाग जतकराची शान वाढविणार आहे.मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात डॉ. रुतूजा जतचं वेगळं स्थान निर्माण करले. एवढं मात्र नक्की……