निगडी खुर्दचे जवान अजित काशिद शहीद
निगडी खुर्दचे जवान काशिद शहीद
आज शासकीय इतमामात अत्यसंस्कार
निगडी खुर्द,वार्ताहर:
जत तालुक्यातील निगडी खुर्द येथील जवान अजित नारायण काशिद (वय-24) शहीद झाले. ते भारत- चिन सिमेवर डोकलाम येथे भारतीय लष्करात सेवा बजावत होते. त्यावेळी त्यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. त्यात काशिद गंभीर जखमी झाले होते.त्यांच्यावर उपचार सुरू असताना मुत्यू झाला होता. दरम्यान सेवेत असताना काशिद जखमी झाले असल्याने मंगळवारी सांगली जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाकडून काशिद यांना शहीद घोषित करण्यात आले आहे.तसा संदेश पाठविण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी शासकीय इतमामात त्यांच्या मुळ गावी निगडी खुर्द येथे अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तशी तयारी निगडी खुर्द येथे करण्यात आली आहे.
देशसेवा बजावत असताना त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्याने शासनाने त्यांना शहीद घाेषीत केले आहे.

दहा दिवसापुर्वी लष्कराच्या वाहनाचा अपघात झाला होता. त्यात काशिद गंभीर जखमी झाले होते. बागडोग्रा, जि. दार्जिलिंग येथील लष्कराच्या बी. एच. हॉस्पीटल या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना सोमवारी त्यांची प्राणज्योत मावळली. काशिद हे लष्करात भरती होऊन तीन वर्षे झाले आहेत. सैन्याच्या इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये सुकामा, पश्चिम बंगाल येथे ते कार्यरत होते.
मंगळवारी रात्री त्यांचे पार्थिव विमानाने पूणे येथे व बुधवारी सकाळी निगडी येथे आणण्यात येईल.
त्याच्या पार्थिव्यावर निगडी खुर्द येथे बुधवारी सकाळी शासकीय इतमामात अत्यसंस्कार होणार आहेत.काशिद यांच्या मुत्यूमुळे संपुर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
दरम्यान शासकीय सर्व यंत्रणा तयार आहेत. गावातील व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान शाहीद अजित काशिद अविवाहित होते.त्याच्या पश्चात आई वडील,विवाहित बहिण,भाऊ असा परिवार आहे.