शेवटच्या दिवसा पर्यत वाट न पाहता नामनिर्देशनपत्र भरा : प्रांताधिकारी शंकरराव बर्गे
शेवटच्या दिवशी पर्यत वाट न पाहता नामनिर्देशनपत्र भरा
: प्रांताधिकारी शंकरराव बर्गे

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील 81 ‘ग्रामपंचायतीची निवडणूकीचे ऑनलाईन नामनिर्देशनपत्र भरणेचा शुक्रवार ता.29 शेवटचा दिवस आहे.नामनिर्देशनपत्र कोठेही व कधीही दिवस-रात्रीही भरता येतात.फक्त त्यांची दाखल प्रत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कडे सादर करावयाची आहे.उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवशीची वाट न पाहता 27 व 28 रोजी नामनिर्देशनपत्र भरून सायंकाळी 4.30 पर्यत सादर करावीत असे आवाहन प्रांताधिकारी शंकरराव बर्गे यांनी पत्रकार बैठकीत केले.
ते म्हणाले,ऐन वेळचे उमेदवार वाढून शुक्रवारच्या शेवटच्या दिवशी सर्वर वर ताण पडून अर्ज भरण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी तालुक्यातील किंवा अन्य ठिकाणी नामनिर्देशनपत्र भरणेची सोय उपलब्धं आहेत. तेथे एक दिवस अगोदर भरावीत.शेवटच्या दिवशीची वाट पाहू नका,त्यापुर्वीच उमेदवारीचे ऑनलाईन नामनिर्देशनपत्र भरून एक दिवस अगोदर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रत सादर करावी. शेवटच्या दिवशी मोठी गर्दीचा अडचणी होऊन नयेत यांची काळजी सर्व उमेदवारांनी घ्यावी असेही प्रांताधिकारी शंकरराव बर्गे यांनी सांगितले.