81 ‘ग्रामपंचायतीसाठी 274 मतदान केंद्रे सर्व यंत्रणा सज्ज :प्रतिज्ञापत्र आवश्यक ; तहसिलदार अभिजित पाटील

0

81 ‘ग्रामपंचायतीसाठी 274 मतदान केंद्रे

 सर्व यंत्रणा सज्ज :प्रतिज्ञापत्र आवश्यक ;    तहसिलदार अभिजित पाटील 

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील 81 ‘ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी 274 मतदान ते निर्माण करण्यात आली आहेत.81 थेट संरपच पदाच्या तर 747 सदस्यांच्या जागासाठी हि निवडणूक होत आहे. त्यासाठी निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार अभिजित पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.

पाटील म्हणाले,निवडणूका विना अडथळा पार पाडाव्यात त्यात कुठेही आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास त्यांच्यावर थेट व कडक कारवाई करण्यात येईल. कुठेही असा काही अनुसुचित प्रकार निदर्शनास आल्यास निसंकोच थेट आमच्यांशी संपर्क साधावा असे आवाहन पाटील यांनी केले. निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी 46 आरओ व 81सहाय्यक नियुक्त केले आहेत.तीन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जात पडताळणी व मदत अशी कामे कक्षातून करण्यात येत आहेत. कोषागार अधिकाऱ्यांची जमा खर्च पाहण्यासाठी नियुक्ती केली आहे. उमेदवारांना प्रतिज्ञा पत्रांची आवश्यकता आहे. सध्या नायब तहसिलदार निवडणूकांच्या कामात गुंतले असल्याने नोटरीवर प्रतिज्ञापत्रे करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. नोटरीही शासकीय दरात करावयाची आहे. जादा पैसे घेतल्याची तक्रार आल्यास तसा अहवाल मी वरिष्ठांना पाठविणार असल्याचेही तहसिलदार अभिजित पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.