संख ग्रामपंचायतीसाठी काटा लढत बसवराज पाटील, आर. के. पाटील गट मैदानात
संख ग्रामपंचायतीसाठी काटा लढत
बसवराज पाटील, आर. के. पाटील गट मैदानात

संख,वार्ताहर : संख ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सत्तासंघर्ष सुरू झाला आहे.अनेक वर्षापासून सत्तास्थानी असलेल्या जिल्हा परिषद माजी उपाअध्यक्ष बसराज पाटील यांच्या गटाला भाजपच्या माजी सभापती आर. के. पाटील गटाचे तगडे आवाहन आहे.
जत तालुक्यातील जत नंतर सर्वात मोठी ग्रामपंचायत, अप्पर तहसिल कार्यालय मंजूरी व भविष्यात तालुका निर्मिती होणारे संख हे गाव असल्याने तेथील ग्रामपंचायतीवर आपलीच सत्ता राहावी यासाठी संखचे दोन ताकतवान नेते एकमेकाविरोधात लढणार आहेत. गत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत सत्ताधारी जनसुराज्य गटाला धक्का देत आर के पाटील गटाचे जिल्हा परिषद, दोन्ही पंचायत समिती गटात उमेदवार निवडून आणून परिवर्तनाचा ढोल वाजविला आहे.सोसायटी निवडणूकीतही आर. के. पाटील गटाचा विजय झाल्याने ग्रामपंचायत निवडणूकीत त्यांचा गट तगडी फाईट देणार हे निश्चित झाले आहे. दुसरीकडे दोन पराभव पचवून नव्याने बसवराज पाटील मैदानात उतरले आहेत. कोणत्याही परिस्थिती ग्रामपंचायतीवर सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांनी सर्व पत्ते ओपन करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वात मोठी काटा लढत येथे पाहायवयास मिळणार आहे. आतापर्यत सत्ता असूनही विकास साधता आला नाही म्हणून आर. के.पाटील गट रान तापवत आहे तर संख गावात जिल्हा,तालुका पातळीवरून अनेक विकास कामे खेचून आणून विकास साधला आहे.त्यामुळे यावेळीही आमचांच विजय निश्चित असल्याचे बसवराज पाटील गटाकडून सांगण्यात आले.