माडग्याळ ‘ग्रामपंचायतीत तिसऱ्या आघाडीचा दे”धक्का”

0

माडग्याळ ‘ग्रामपंचायतीत तिसऱ्या आघाडीचा दे”धक्का”

Rate Card

 

बिनविरोधचे प्रयत्न फसले; मतलबी राजकारण; पुन्हा बगलबच्चेनांच घुसडल्याचा प्रयोग?


माडग्याळ,वार्ताहर: माडग्याळ (ता.जत) येेेथील यंदाची ग्रामपंचायत निवडणूक अंत्यत चुरशीची ठरणार असे संकेत मिळत आहेत. कारण दोन्ही प्रमुख पक्षाच्या विरोधात तिसरी आघाडी रिंंगणात उतरणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या गाव बिनविरोध काढण्याच्या बेताला खो बसला आहे. दोन्ही पक्षाकडून तिसरी आघाडीचे मनधरणी करणे शक्य झाले नसल्याने निवडणूका होणार हे निश्चीत झाले आहे.
           दोन्ही पक्षांचा विचार केल्यास दोन्ही पक्षांची गावातील सद्याची स्थिती काही ठिक नाही. गेल्या पाच वर्षात शिवसेना कार्डवर निवडणूक लढवणून आलेले उमेदवार मुळचे काँग्रेसचेच असल्याने ते कालांतराने त्यातच विलीन झाले. झालेली निवडणूक मुळ काँग्रेसला विरोध म्हणूनच लढवण्यात आली होती.मतदारांनी देखील त्यापद्धतीने शिवसेना एक उत्तम पर्याय म्हणून ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात दिली होती. मात्र लोकांच्या या निर्णयाचा लवकरच भ्रमनिरास झाला. त्याचप्रमाणे भाजपचे देखील झाले आहे. माडग्याळ मधील अप्पर तहसिल कार्यालयाच्या आंदोलनाला भाजपकडून प्रतिसाद तरी सोडाच साधा समर्थन देखिल मिळाले नाही. उलट भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग न घेण्याचा फर्मान तालुक्यातून सोडण्यात आले. त्यामुळे बरेच भाजप कार्यकर्ते भाजप पासून दुरावले आहेत.ह्या   दोन्ही बाबी जरी माडग्याळमध्ये तिसरी आघाडी उदयास येण्यास कारणीभूत असल्या तरी खरी कथा औरच आहे. पक्षामध्ये राहून काम करणा-या सच्चा कार्यकर्त्यांना ग्रामपंचायती मध्ये संधी दिली जात नसल्याने तरूण पिढी नाराज आहे. हि स्थिती ओळखून दोन्ही पक्षांनी गाव बिनविरोध काढण्याचा निर्णय घेतला. यात त्यांना ब-यापैकी यश देखील आले.मात्र;परत ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदाचे उमेदवार हे त्यांचेच बगलबच्चे असल्याने तिस-या आघाडीचे प्रणेते सदाशिव माळी, कामण्णा बंडगर, महादेव माळी यानी बिनविरोध काढण्याच्या बेताला आपली असहमती दर्शवली आहे. व पुर्ण ताकतीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  याची चाचपणी म्हणून गुुुरुवारी बैठक घेण्यात

आली.जनतेकडून त्याना चांगला प्रतीसाद मिळाला. यावेळी लोकांनी नेते आपल्या स्वार्थासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढत असल्याचे मत व्यक्त केले. ग्रामपंचायत मधील कारभार स्वच्छ चालण्यासाठी सरपंच हा जनतेतूनच निवडून गेलेला असावा, सरकारने आपल्याला हा अधिकार दिला असताना नेते मंडळी आपल्या रिमोट कंट्रोलवर चालणा-या सरपंचाची व सदस्यांची वर्णी ग्रामपंचायत मध्ये लावत असल्याचे आरोप करण्यात आले. त्यामुळे प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने तिस-या आघाडीचे मनोधैर्य वाढले आहे व निवडणूक लढवण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. तिसरी आघाडी निवडणूक लढवल्यास मात्र निवडणूकीचे सगळे समिकरण बदलणार आहेत. सर्व पक्ष विरूध्द तिसरी आघाडी अशी लढत बघण्यास मिळू शकते. कारण बिनविरोध काढण्या प्रसंगी जाती-धर्माचा कार्ड खेळण्यात आले होते. 15-20 वर्षे पक्षात असणा-यांना समाजाचे रस्ते दाखवण्यात आले. आत्ता परिस्थीती बदलली असल्याने हे कार्यकर्ते परत मिळवणे नेत्यांना कठीण जाणार अाहे. कारण यातील ब-याच कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांची ही भुमिका रूचलेली नाही. याला पर्याय म्हणून त्यानी तिसरी आघाडी हा समर्थ पर्याय निवडला आहे. आधीच मजबूत असलेली तिसरी आघाडी नाराजांच्या येण्याने अजून भक्कम बनणार आहे. त्यामुळे येणारी माडग्याळ ग्रामपंचायत निवडणूक अंत्यत चुरशीची ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.