‘गोलमाल अगेन’चा डबल धमाका; पोस्टर पाठोपाठ ट्रेलर रिलीज
नुकताच रोहित शेट्टीच्या आगामी ‘गोलमाल अगेन’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. याही चित्रपटात नेहमीप्रमाणे रोहित शेट्टीचे एन्टरटेन्मेंट मॅजिक बघायला मिळणार आहे. रोहितची जुनी टीम काही नवीन कलाकारांसह पुन्हा एकदा मनोरंजनाचा तडका लावण्यासाठी सज्ज झाली आहे.
हा चित्रपट येत्या दिवाळीत म्हणजेच २० ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. याआधीचे गोमलाम सीरिजमधील सर्वच चित्रपट तूफान गाजले. प्रेक्षकांवर नेहमीच रोहित शेट्टीच्या या सेन्सलेस कॉमेडी चित्रपटांची जादू चालली आहे. आता पुन्हा एकदा तो प्रेक्षकांना पोट धरून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.

अजय देवगन, तब्बू, अर्शद वासरी, परिणीती चोप्रा, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू यांच्या मुख्य भूमिका ‘गोलमाल अगेन’मध्ये आहेत. तर प्रकाश राज, निल नितीन मुकेश, जॉनी लिवर, मुकेश तिवारी, संजय मिश्रा, मुरली शर्मा, अश्विनी काळसेकर, विजय पाटकर आणि सचिन खेडेकर यांच्याही भूमिका आहेत.