एकाच क्षणात होत्याचे नव्हते करून टाकू
उत्तर कोरियाची अमेरिकेला धमकी
न्यूयॉर्क : पुन्हा एकदा अमेरिकेला उत्तर कोरियाने डिवचले असून उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री रि योंग हो यांनी अमेरिकेजवळ पॅसिफिक महासागरात हायड्रोजन बॉम्बचा स्फोट घडवून हादरवून टाकू अशी धमकी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला याआधी त्यांनी भुंकणाऱ्या कुत्र्याची उपमा दिली होती.
आमच्याविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई जर अमेरिकेने केली, तर आम्ही आमचा शक्तीशाली हायड्रोजन बॉम्ब पॅसिफिस महासागरात टाकू, असेही उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी धमक्यांची किंमत मोजावी लागेल असे म्हटल्यानंतर आता परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेला धमकी दिली आहे.

आतापर्यंतचा पॅसिफिक महासागरातील हा सर्वात मोठा हायड्रोजन बॉम्बस्फोट असेल. यासाठी काय कारवाई करावी लागेल, हे आम्हाला माहित नाही. कारण किम जोंग उन यांच्या आदेशानंतरच कारवाई केली जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर किम जोंग कठोर पावले उचलण्याचा विचार करत असल्याचे री योंग हो यांनी म्हटले आहे.