विस्तारित योजनेच्या कामाला गती | अंदाजपत्रक व नकाशे तयार करणेसाठी निविदा ; प्रकाश जमदाडे 

0
जत,संकेत टाइम्स : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ‌संख येथील मेळाव्यात केलेल्या घोषणेप्रमाणे जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी देण्यासाठी युध्द पातळीवर काम सुरू केले आहे.योजनेच्या प्रत्यक्षात काम सुरूवात झाली आहे.या योजनेचा अंदाजपत्रक व नकाशे तयार करणेसाठी १८३ लाखाची निविदा जलसंपदा विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.आम्ही दीर्घ काळ केलेल्या आंदोलनाला यश आले असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे संचालक तथा राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते प्रकाश जमदाडे यांनी दिली.
जमदाडे म्हणाले, जत तालुक्यातील १७ अंशतः व ४८ पूर्णतः गावांना पाणी द्यावे,म्हणून आम्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन १ जानेवारी २०२० व १ फेब्रुवारी २०२० रोजी प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले होते.गेल्या २ वर्षाच्या कालावधीत वेळोवेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,अर्थमंत्री अजित पवार,जलसंपदा मंत्री जयंत पाटील व खा.संजयकाका पाटील यांना प्रत्यक्ष भेटून व निवेदन देऊन विस्तारीत म्हैसाळ योजना मंजूर करून वंचित गावांना पाणी द्यावे,अशी मागणी सातत्याने लावून धरली होती.
जमदाडे म्हणाले,ना.जयंत पाटील यांनी एक महिन्यांपूर्वी या योजनेसाठी वारणा धरणातून बिगर सिंचनाचे वापर विना शिल्लक असणारे ६ टी.एम.सी.पाणी मंजूर केले होते.आम्ही ६५ गावातून सवांदयात्रा काढून ११ सप्टेंबर रोजी संख येथे शेतकरी मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यामध्ये ना.जयंत पाटील यांनी येत्या ५ ते ६ महिन्यात या योजनेचे काम चालू होईल असे ठोस आश्वासन दिले होते.ना.जयंत पाटील यांनी दिलेल्या शंब्दानुसार कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून या योजनेतील पंप हाऊस,दाब नलिका व वितरण नलिका याचे सविस्तर अंदाजपत्रक नकाशे व इतर अनुषंकिंग बाबीसाठी ३ महिन्याची मुदत देऊन नुकतीच १८३ लाख रुपयाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

त्यामुळे योजनेच्या कामाला गती आली आहे.येत्या काही महिन्यात या योजनेचे सविस्तर अंदाजपत्रक व नकाशे तयार होऊन अर्थसंकल्पात या योजनेच्या कामासाठी भरीव तरतूद करण्यात येणार आहे.तांत्रिक,प्रशासकीय व निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन पुढील ६ महिन्यामध्ये प्रत्यक्ष कामास सुरवात होऊन २०२४ पर्यंत वंचित गावांतील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी येईल,याची आम्हाला पूर्ण खात्री आहे,असेही जमदाडे म्हणाले.
शंब्द खरा करणारे नेते
शंब्दाला पक्के असणारे राज्याचे नेते जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संखमध्ये दिलेला शंब्द खरा केला असून आता या योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे.नकाशे,अंदाजपत्रक पुर्ण होऊन जत तालुका कायमचा दुष्काळ मुक्त होणार आहे.
– प्रकाश जमदाडे,रेल्वे बोर्डाचे संचालक

Rate Card
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.