भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी जगदीप धनखड यांच्या नावाची घोषणा

0
नवी दिल्ली : भाजपच्या संसदीय मंडळाची शनिवारी सायंकाळी बैठक संपन्न झाली. या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन जगदीप धनखड यांच्या नावाची घोषणा केली. जगदीप धनखड याअगोदर पश्चिम बंगालचे राज्यपाल होते.

 

या ना त्या कारणांवरुन त्यांचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संघर्ष होत राहिला, त्यांचा संघर्ष देशात चर्चेचा विषय ठरायचा. आज त्याच धनखड यांना भाजपने उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली आहे. ६ ऑगस्ट २२ रोजी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल आणि त्याच दिवशी निकालही लागेल.

 

Rate Card
विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ येत्या ११ ऑगस्ट रोजी संपत आहेत.मुख्तार अब्बास नक्वी, नजमा हेपतुल्ला आणि केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची नावे उपराष्ट्रपती पदासाठी चर्चेत होती.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.