इंग्लंडमध्ये विद्यार्थी सुद्धा काम करून शिक्षण घेतात ! 

0
जत,संकेत टाइम्स : खोजनवाडी ता.जत येथील बसव मंडप येथे 827 वी बसव पंचमी साजरी करण्यात आली. शाळेच्या मुलांना दूध वाटप करून एक आदर्श निर्माण करण्यात आला.बसवेश्वरांच्या वचनाप्रमाणे दगडाच्या नागाला दूध पाजतात जिवंत जंगम आला तर पुढे चला म्हणतात.बसावा धर्मपीठ कुडल संगम चे राष्ट्रीय बसव दल हा कार्यक्रम साजरा केला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्विकारून शरण तुकाराम माळी सर म्हणाले, हा उपक्रम एक कौतुकाची आहे कारण बसवेश्वरांच्या विचाराप्रमाणे दूध हा सकस आहार असून हा नागोबा वर अनावश्य वापर न करता गरिबांना लहान मुलांना दूध वाटप केल्यामुळे आरोग्याला एक पूरक सकस आहार मिळेल म्हणजे दूध नाश न करता त्याचा चांगल्यासाठी वापर व्हावा हा उद्देश आहे.

 

इंग्लंडला जाऊन आलेल्या शरण धानाप्पाण्णा पट्टणशेट्टी यांनी सत्कार स्वीकारून म्हणाले, इंग्लंडमध्ये प्रत्येक विद्यार्थी सुद्धा दिवसात दोन तास तरी काम करून शाळा शिकता.म्हणजे याच्या अर्थ बसवेश्वरांच्या कायकवे कैलास हा तत्व तेथे कार्यरूपात आहे. काय कभी कैलास हा तत्व जन्म घेतले भारतात पण कार रोपात आलेले प्रमाण कमी आहेत. आपल्या देशात सुद्धा प्रत्येकाने काम केल्याशिवाय प्रसाद स्वीकारू नये हा उद्देश बसवेश्वरांचा होता ते आज आपण प्रत्येकाने पालन करणे आवश्यक आहे असे आव्हान केले.
बसव पूजन करून शरण शिदराया काराजनगी म्हणाले, दरवर्षी बसव पंचमी व नीलम षष्ठी कार्यक्रम खोजनवाडी प्रमाणे इतर अनेक गावात सुद्धा आचरणात आणावे असे आव्हान केले. शरण संगमेश्वर. हिप्परग कार्यक्रमाचे निरूपण करून म्हणाले, बसव तत्व फक्त सांगून काही उपयोग नाही प्रत्येकाने आचरणात आणणे आवश्यक आहे म्हणजे नागपंचमी ऐवजी बसव पंचमी म्हणून साजरा आपण करीत आहोत.

 

श्रावण महिन्यात घरोघरी बसव ज्योती नेण्याच्या उद्देशाने कुडलसंगमातून बसव ज्योती आणण्यात आले आहे. घरोघरी बसव ज्योती म्हणजे हा एक ज्ञानज्योती आहे. म्हणजे अंधश्रद्धेतून बाहेर पडून श्रद्धेच्या मार्गाने वैज्ञानिक युगात जगणे आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून श्रावण महिना संपेपर्यंत प्रत्येकांचा घरोघरी हा ज्योत नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

या कार्यक्रमात अनेक मान्यवर गावातील अनेक नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते डफळापूरचे शरण महादेव आप्पा तेली व इतर अनेकांनी सहभाग घेतले कार्यक्रमातील उत्साहात पार पडले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.