दुचाकी-ट्रव्हलचा अपघात | ट्रॅव्हल्सचे चाक डोक्यावरून गेले,एकाचा जागीच मृत्यू

0

आटपाडी : घरगुती पिठाची गिरणी मोटारसायकलवर घेऊन घरी जात असताना मोटारसायकल व ट्रॅव्हल्सची गंभीर धडक बसल्याने मोटारसायकलवर मागे बसलेल्या पृथ्वीराज महाडीक याच्या डोक्यावरून ट्रॅव्हल्सचे चाक गेल्याने त्यांच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्या. या अपघातात तो जागीच ठार झाला.म्हसवडवरून जाणाऱ्या महाडीकवाडी येथे हा अपघात झाला आहे.ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,म्हसवड नजिकच्या विरकरवाडी रस्त्यावर जामदार वाडा परिसरातील महादेव मंदिरासमोर आटपाडी तालुक्यातील दिघंची शेजारील महाडीकवाडी येथील सत्यवान मधुकर महाडीक व त्यांचा मुलगा पृथ्वीराज सत्यवान महाडीक (वय १७) हे बापलेक म्हसवड येथील एका दुकानातून पाडव्याच्या मुहूर्तावर घरगुती पिठाची गिरण मोटारसायकलवर घेऊन म्हसवडवरुन महाडीकवाडीकडे निघाले होते.दरम्यान त्यांची दुचाकी व ट्रॅव्हल्स यांच्यात जोराची धडक झाली.त्यात दुचाकीवर मागे गिरण घेऊन बसलेल्या पृथ्वीराज याच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 

हेही वाचा-लोकसभेच्या ६ जागा हा पक्ष लढविणार | कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याचे आवाहन

या अपघातात जखमी झालेल्या रुपेश रघुनाथ लुबाळ (वय ३४, रा. शिरगाव, ता. माण, जि. सातारा) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात सत्यवान मधुकर महाडिक (रा. महाडिकवाडी लिंगवरे, ता. आटपाडी, जि. सांगली) यांच्या विरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिनांक २१ मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विरकरवाडी (ता. माण) गावाच्या हद्दीत अस्मितानगर येथे लुबाळ हे रस्त्याच्या बाजूला गाडी लावून फोनवर बोलत असताना सत्यवान मधुकर महाडिक यांनी दुचाकी निष्काळजीपणाने चालवून माझ्या गाडीला ठोकर दिली.
Rate Card

हेही वाचा- नवऱ्यांचा नादचं खुळा,बायकोच्या वाढदिवसाला चक्क गौतमी पाटीलची लावणी

‘यामध्ये माझ्या व त्याच्या गाडीचे नुकसान झाले. अशी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.’ म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलीस हवलदार एस. एस. जाधव अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.