विजय ताड खून प्रकरणातील संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

0

जत येथील नगरसेवक विजय ताड‌ खून प्रकरणी संशयित बबल्यासह अन्य तिन साथीदारांना पोलीस कोठडीत वाढ करत आणखीन चार दिवस पोलीस कोठडी जत न्यायालयाने सुनावली आहे.मुख्य आरोपी उमेश सांवत यांना अटक न केल्यास कुंटुबियांनी आत्मदहन करू असा इशारा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांची भेट घेऊन दिला आहे.

आटपाडीत पिस्तूलसह तीन काडतुसे जप्त | स्कॉर्पिओसह,दोघांना अटक वाचण्याठी येथे क्लिक करा

भाजपचे जत येथील माजी नगरसेवक विजय ताड यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित चार आरोपींच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली.त्यांना २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिलेली होती. त्यांना सोमवारी न्यायालयात पुन्हा हजर केले होते. पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती.ताड यांची हत्या उमेश सावंत याने सुपारी देऊन केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे, तो फरारीच आहे.यामुळे ताड कुटुंबीयांनी सोमवारी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

 

रस्त्याचा वाद विकोपाला,काकाचा पुतण्याने केला धारदार शस्ञाने खून | बेंळकीतील घटना सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

ताड यांना तातडीने अटक करावी अन्यथा सर्व कुटुंबीय आत्मदहन करू, असा इशारा विक्रम ताड यांनी निवेदनात दिला आहे.निवेदन पोलिस प्रमुख, जिल्हाधिकारी,मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही दिले आहे.विजय ताड यांची १७ मार्च रोजी गावठी पिस्तूल मधून गोळ्या झाडून व दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली.संदीप उर्फ बबलू चव्हाण, किरण
Rate Card
चव्हाण, आकाश व्हनखडे तर निकेश उर्फ दाद्या मदने यांना न्यायालयासमोर उभे केले असता सात दिवसांची कोठडी सुनावली होती.

बचत गटांच्या सबलीकरणासह आता गरजूंना घर अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

तीन गावठी पिस्टल व दोन वाहने ताब्यात विजय ताड खून प्रकरणाचा तपास सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे. पोलिसांनी या तपासात संशयीत आरोपींकडून चार गावठी पिस्तूल व दोन दुचाकी वाहने जप्त केले आहेत.आरोपींनी हे तीन गावठी पिस्टल मध्यप्रदेशातून आणल्याची कबुली दिली असल्याचे सांगण्यात आले.

 

दुचाकी-ट्रव्हलचा अपघात | ट्रॅव्हल्सचे चाक डोक्यावरून गेले,एकाचा जागीच मृत्यू वाचा सविस्तर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.