राहत्या घराला आग,गायीचा मृत्यू,म्हैसही भाजली

0

घरांना आगी लागण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे.यात अनेक कुंटुबे उघड्यावर येत आहे.नागरिकांनीही यात काळजी घेण्यातची गरज आहे.नुकतीच वळसंग नंतर डफळापूर येथे एक घर अचानक पेट घेतला त्यात काही क्षणात होत्याचे नव्हते झाले.

 

डफळापूर येथील संदिप महादेव माळी यांच्या राहत्या घराला आग‌ लागून संसारउपयोगी साहित्य जळाले तर एक जरशी गायीचा मुत्यू झाला म्हैस पुर्ण आगीत भाजली आहे.यात सुमारे अडीच लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.

 

महावितरण कार्यालयाच्या बाजूला संदिप माळी यांचे घर आहे.त्या शेजारीच जनावराचा गोठा आहे.गोठ्यास अचानक आग लागली,बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले.संदिप माळी व घरातील अन्य लोक, महावितरणचे कर्मचारी,रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी तातडीने अन्य जनावरे सोडले मात्र दोन जनावरे सोडण्या आधीस आग भडकल्याने एक गायीचा मृत्यू झाला तर म्हैस ९० टक्के भाजली आहे.

Rate Card

 

त्याशिवाय संसारउपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.तलाठी हणमंत बामणे व पशूपैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचनामा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.