टायर,ट्यूब चोरणारा चोरटा जेरबंद

0

बीव्हीजी ग्रुपच्या रूग्णवाहिकांच्या ११ टायर आणि ट्यूब चोरणाऱ्या एकास पोलीसांनी अटक केली आहे.मिरज तालुक्यातील कर्नाळ ‌येथे ही घटना घडली होती.संशयिताकडून पोलीसांनी ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती, पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी दिली.आकाश रामा गगनमल्ले (वय २२, रा.विठ्ठलनगर, कर्नाळ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

हेही वाचा-विजय ताड खून प्रकरणातील संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

जिल्हा पोलीस‌ प्रमुख डॉ.बसवराज तेली यांनी विविध चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे
आदेश दिले आहेत.त्यानुसार सांगली
ग्रामीणचे पोलिस निरीक्षक गायकवाड
यांनी एक पथक तयार करून संशयिताचा शोध सुरू केला होता.सोमवार ता.२८ रोजी कर्नाळ येथील बीव्हीजी ग्रुपच्या रूग्णवाहिकांच्या देखभाल, दुरूस्ती सर्विस स्टेशनमधून ११ टायर आणि ट्यूब गायब झाल्या होत्या.

 

हेही वाचा-राहत्या घराला आग,गायीचा मृत्यू,म्हैसही भाजली

याबाबत मिरज पोलीसात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास करताना पोलीसांच्या  पथकाला ही चोरी आकाश गगनमल्ले याने केल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली.त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.त्याच्याकडून चोरीच्या ६० हजार रूपये किमतीच्या टायर ट्यूब जप्त केल्यात.

 

Rate Card

हेही वाचा-देवाण-घेवाणच्या त्रासातून तरूणांची आत्महत्या, एकावर गुन्हा दाखल

पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण मगदूम, धनंजय चव्हाण, रमेश कोळी, संतोष माने, सचिन मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.अधिक तपास मिरज पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.