जत येथील गणेश पतसंस्थेला १ कोटी ३४ लाख ढोबळ नफा

0
जत येथील गणेश व्यापारी पतसंस्थेला सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये १ कोटी ३४ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन मल्लिकार्जुन इटंगी आणि व्हा.चेअरमन मोहन माळकोटगी यांनी पत्रकार बैठकीत दिली.यावेळी संस्थेचे चेअरमन इटंगी म्हणाले, ३१ मार्च २०२३ अखेर  एकूण रूपये २४ कोटी रुपयांचा समिश्र व्यवसाय झाला आहे. एकूण ठेवी ११ कोटी ९० लाख आहेत व  संस्थेच्या कर्जदारांकडून सोने गहाण कर्ज मागणीत वाढ झाल्याने एकूण कर्जे १२ कोटी २९ लाख ₹ कर्जवाटप केले आहे.

खुपसलेला पाठीतील चाकूसह ‘तो’ पोहोचला रुग्णालयात येथे क्लिक करून वाचा सविस्तर

संस्थेचे वसूल भागभांडवल रुपये.६७ लाख इतके असून, राखीव व इतर सर्व निधी ५ कोटी ४३ लाख, इतके असून, संस्थेने  पोटनियमा नुसार कर्जाचे वाटप करुन  शिल्लक असलेली रक्कम ५ कोटी ९१ लाख इतकी गुंतवणूक केलेली आहे. आणि चालू आर्थिक वर्षात पोट नियमानुसार कराव्या लागणाऱ्या सर्व तरतुदी करुन खर्च वजा जाता, संस्थेला ₹-६५ लाख इतका भरघोस नफा झाला असून, एन. पी. ए. चे प्रमाण 0 टक्के आहे. जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पत-संस्थेची भव्य दिव्य अशी स्वमालकी ईमारत, स्ट्राँग रूम आणि लॉकर सुविधा उपलब्ध आहे. पत-संस्थेमध्ये, बँक प्रमाणे, सीबीएस प्रणाली सॉफ्टवेअर सिस्टीम चालू करून सभासदांना आणि ग्राहकांना कमीत कमी वेळेत त्यांच्या खात्यावरील रक्कम एका ठिकाणाहून दुसरीकडे कुठेही, पैसे पाठवणेची सोय व्हावी याकरिता आर. टी. जी. एस. व एन. ई. एफ. टी. सुविधा चालु केली आहे.

बाजार समिती निवडणूक : दिग्विजय चव्हाण, अभिजीत चव्हाण यांचे अर्ज दाखल

Rate Card

आपल्या संस्थेच्या सभासदांना प्रती वर्षी १० टक्के प्रमाणे डिव्हीडंड देण्यात येते. आणि चालू आर्थिक वर्षात संस्थेत वातानुकूलित करण्याचे कामकाज चालू करण्यात आले आहे. तसेच संस्थेचे कर्मचारी, ग्राहकांना कमीत कमी वेळेत संस्थेच्या आर्थिक व्यवहाराच्या खास करून सोने-तारण कर्ज कमीत कमी व्याज दराने सुविधा उपलब्ध करुन देते.

विजय ताड खून प्रकरणातील उमेश सावंत यांची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस वाचा सविस्तर

संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ आणि कर्मचारी यांनी खर्चामध्ये बचत, काटकसर, आणि प्रामाणिक कामकाज करून संस्थेला उच्च शिखरावर विराजमान करण्याचं प्रयत्न करीत आहेत. चालू आर्थिक वर्षात संस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि संस्थेचे हितचिंतक यांनी भरघोस सहकार्य केल्याने, चांगला व्यवसाय आणि विक्रमी नफा झाला आहे.यापुढे ही पतसंस्थेच्या माध्यमातून कमीत-कमी वेळेत, कमीत-कमी व्याज दारात कर्ज पुरवठा व चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

जतचा नेत्रदिपक नजारा,ढगाची झालर,राष्ट्रीय महामार्गावरून घेतलेला “व्हि’डि’ओ” एकदा पहाच..

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.