गेल्या ५० वर्षापासून परपरांगत असणाऱ्या बांबूपासून बनवलेल्या ताटवे – टोपल्या विकण्याचा व्यवसाय मुलगा आमदार झाल्यानंतरही गंगुबाई अर्थात अम्मा जोरगेवार यांनी आजही सुरू ठेवला आहे.आजही त्या यात्रेत टोपली विकत असतानाचा व्हिडिओ समाज माध्यमात आल्याने त्यांच्या व्यवसायाशी असणारी निष्ठेची चर्चा होत आहे.
कितीही मोठे झालो तरीही आपला परंपरागत व्यवसाय सोडायचा नाही,हे यावरून त्यांनी दाखवून दिले आहे.गंगुबाई जोरगेवार(अम्मा)या चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री आहेत. चंद्रपूरच्या घनदाट वस्तीत गेली पन्नास वर्षे नेटाने ताटवे-टोपल्या बनवून विकण्याचा हाच व्यवसाय करणाऱ्या अम्मा जोरगेवार यांनी यंदाही देवी महाकाली यात्रेत आपले विक्रीचे दुकान थाटले आहे.
सतर्कतेचा इशारा ; देशात करोना पुन्हा वाढतोय,महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना टेन्शन
ग्राहकांशी तीच घासाघीस तेच सौदे आणि त्यानंतर श्रद्धेने देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गंगुबाई जोरगेवार(अम्मा)चंद्रपूरच्या बांबूच्या टोपल्या देण्यात आनंद शोधत आहेत. वार्धक्य आले तरी आणि मुलगा लोकप्रतिनिधी आमदार झाला तरी गंगुबाईंची व्यावसायिक धडपड सुरूच आहे.परिस्थिती कितीही बदलली तरीही आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक असायला पाहिजे हे या निमित्ताने पुन्हा आधोरेखित झाले आहे.
लोकोत्सव देणार आशेची नवी किरणे, नव्या जीवनशैलीचा हुंकार