नगरसेवक विजय ताड यांच्या खूनातील संशयितांना मोका

0
2
जत नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शिवाजी ताड यांच्या खूनातील संशयितावर मोका कायद्यातर्गंत कारवाईस विशेष पोलीस महानिरिक्षक सुनील फुलारी यांनी मंजूरी दिली आहे.
या खून प्रकरणातील मुख्य संशयित माजी नगरसेवक उमेश सावंत अद्याप फरार आहे.या खून प्रकरणातील संशयित टोळी प्रमुख संदिप उर्फ बबलु शंकर चव्हाण (वय २७, रा. मोरे कॉलनी, जत), आकाश उर्फ अक्षय सुधाकर व्हनखंडे ( २४, रा. सातारा रोड), किरण विठ्ठल चव्हाण (२७, रा. आर. आर. कॉलेजजवळ), निकेश उर्फ दाद्या दिनकर मदने (२४, रा. मौजे डिग्रज, ता. मिरज) यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आला आहे.
पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,जत येथे नगरसेवक विजय ताड यांचा संदीप चव्हाणसह चार जणांच्या मदतीने गोळ्या घालून व डोक्यात दगड घालून हत्या केली होती.नगरसेवक यांच्या सांगण्यावरून ही घटना घडवून आणल्याची संशयितांनी पोलीसांनी कबूली दिली होती.या प्रकरणी पोलिसांनी चारही संशयितांना अटक केली आहे.मुख्य संशियत उमेश सावंत अद्याप फरार आहे.त्याच्या पथकाकडून शोध सुरू आहे. दरम्यान अटकेतील चारी संशयितांवर जत, मिरज ग्रामीण, सांगली ग्रामीण व विश्रामबाग पोलिस ठाण्यात दरोडा,जबरी चोरी, घरफोडी, खंडणी, खून,खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, अपहरण, गर्दी, मारामारी, सरकारी कामात अडथळा असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
२०१४ पासून ही टोळी संघटित गुन्हेगारी करीत आहेत.संशयितांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांच्याविरुध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातंर्गंत वाढीव कलम लावण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पाठविला होता. फुलारी यांनी कायदेशीर बाबीची पडताळणी करून चारही संशयिताविरूद्ध मोका कायदा लागू करण्यास मंजुरी दिली आहे.यामुळे खळबळ उडाली असून पोलीसांनी ही कारवाई करून गुन्हेगारीला रोकण्याचा प्रयत्न चालविला आहे.अधिक तपास प्रभारी डिवायएसपी श्रीमती शेंडगे करत आहेत.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here