सांगली बाजार समितीसाठी आज मतदान

0
सांगली बाजार समितीसाठी आज जिल्ह्यात मतदान होत आहे.१८ जागासाठी ९० उमेदवार नशिब आजमावत आहेत.जिल्ह्यातील सांगली,मिरज,कवठेमहाकांळ,जत तालुक्यातील २४ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.कॉग्रेस-राष्ट्रवादी,अजितराव घोरपडे गट विरूध भाजपच्या पँनेलमध्ये ही लढत होत असून तिसरे परिवर्तन पँनेलही मैदानात आहे.
दरम्यान गेल्या आठवड्यापासून प्रचाराचा धुरळा उडाला असून पालकमंत्री,प्रदेशाध्यक्षसह जिल्ह्यातील मोठे नेते तळ ठोकून आहेत.या निवडणूकीत जत तालुक्यातील सर्वाधिक मतदान असल्याने सर्वांचे लक्ष जत तालुक्यावर आहेत.जत तालुक्यातून तब्बल ७ पेक्षा जादा संचालक निवडून येणार आहेत.
आज जत शहरात चार मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.सोसायटी व ग्रामपंचायत गट असे मतदार आहेत.ग्रामपंचायतीचे सदस्य,सोसायटी संचालक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जतच्या कुणीकोणुरमध्ये मायलेकीचा गळा आवळून खून 

व्यापारी, हमाल गटातही जोरदार चुरस
यंदाच्या निवडणुकीमध्ये उच्चांकी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.समितीच्या १८ जागांसाठी प्रचाराचे रान पेटले. महाविकास आघाडी व भाजप पॅनेलने प्रत्येकी १५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. व्यापारी गटातील दोन आणि हमाल गटातील एका जागेसाठीही मोठी चुरस निर्माण झाली आहे. विशेषत: व्यापारी गटात हे चित्र पाहण्यास मिळत आहे. व्यापार गटातसुद्धा क्रॉस मतदान होणार अशी चर्चा आहे. याचा फटका कोणाला बसणार याबाबत उत्सुकता आहे. फळमार्केट व यार्डातील असे प्रत्येकी एक उमेदवार एकत्र आल्याने ही चुरस वाढली आहे. त्याशिवाय मिरज, जत, कवठेमहांकाळचे व्यापारी काय करणार, याकडेही लक्ष आहे.

Rate Card

दिग्विजय चव्हाण यांच्या रुपाने बाजारसमितीत डफळापूरच्या भूमिपुत्राचे संचालक पद निश्चित !

कोरोना व अन्य कारणामुळे निवडणूक अडीच वर्षे लांबणीवर पडली होती. तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या सांगली बाजार समितीला
राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मागील आठ दिवस आरोप-प्रत्यारोपानंतर आज शुक्रवारी मतदान होत आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होईल. शनिवारी (दि. २९) रोजी मिरजेत मतमोजणी होणार आहे. बाजार समितीसाठी ८ हजार ६७५ मतदार आहेत. तीन तालुक्यांत २४ ठिकाणी मतदान केंद्रे निश्चित केली आहेत.सांगली शहरात ८ मतदान केंद्र, मिरज शहरात ४ आहेत.कवठेमहांकाळमध्ये ५, तर जतमध्ये ७ मतदान केंद्र आहेत.

श्रीपती शुगरकडून संपूर्ण ऊसबिल जमा

बाजार समिती निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवरील तयारीही पूर्ण झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सहकार उपनिबंधक मंगेश सुरवसे, गणेश काटकर यांनी दिली. मतदानासाठी १५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गुरुवारी दुपारी मतदानाचे साहित्य घेऊन कर्मचारी केंद्रावर रवाना झाले. मतदान केंद्रावर अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.