म्हैसाळ योजनेतून पुर्ण क्षमतेने पाणी सोडावे |- शेतकऱ्यांची मागणी
म्हैसाळ योजनेचे उन्हाळी आवर्तन गेल्या काही दिवसापासून झाल्याने जत तालुक्यातील अनेक गावांना याचा लाभ होत आहे.मात्र पाण्याचा वेग पुर्णत: कमी असल्याने पुढील मागणी असलेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास विलंब होत आहे.त्यामुळे पर्ण क्षमतेने पाणी सोडावे अशी मागणी होत आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्याने तालुक्यातील अनेक तलाव, पाणवठे कोरडे पडले आहेत.म्हैसाळचे उन्हाळी आवर्तन सुरु मात्र पाणी कमी प्रमाणात येत असल्याने मागणीनुसार वेळेत पाणी मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे जत तालुक्यातील लाभक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.सध्या तीव्र उन्हाळा सुरु झाला आहे. अनेक तलाव व पाणवठे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत.तालुक्यातील लाभ क्षेत्रात पुर्ण क्षमतेने कँनॉलमधून पाणी सोडावे,मागणी होत आहे. काही गावातील शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरूनही पंधरा दिवस झाले तरीही पाणी येत नसल्याची ओरड शेतकरी करत आहेत.