बबलेश्वर विधानसभा | एम.बी.पाटील पाचव्यावेळा विजयी होणार की,मतदार भाकरी फिरवणार ?

0

जत : जतच्या लगतच्या सिमावर्ती कर्नाटकातील बबलेश्वर विधानसभा मतदारसंघात यंदाही पारंपरिक विरोधकांमध्ये लक्षवेधी लढत होत आहे. काँग्रेस,भाजप व जनता दल सेक्युलर पक्ष यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.परंतु, मुख्य लढत काँग्रेस व भाजपमध्ये चुरशीने होणार आहे.या ठिकाणी काँग्रेसचे बडे नेते, माजी मंत्री विद्यमान आ.डॉ.एम. बी. पाटील हे पाचव्यांदा विजयी होणार काय, याकडे कर्नाटकसह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले

आहे.विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर विधानसभा मतदारसंघ संवेदनशील
आहे.जत तालुक्याला लागून हा मतदारसंघ आहे. बबलेश्वर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. १९६७, १९९४, १९९९ या निवडणुकांचा अपवाद वगळता ११ वेळा मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळविला आहे. २००८ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली.तिकोटा नाव बदलून बबलेश्वर असा मतदारसंघ झाला. या मतदारसंघात ८६ गावांचा समावेश आहे. तिकोटा व बबलेश्वर ही तालुक्याची ठिकाणे आहेत.

सांगलीत पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

या निवडणुकीत काँग्रेसचे आ.डॉ.एम. बी. पाटील, भाजपचे विजयगौडा पाटील,जनता दल सेक्युलर पक्षाचे बसवराज शरच्चंद्र व्हनवाड हे निवडणूक लढवत आहेत. खरी लढत काँग्रेस व भाजपमध्ये होणार आहे.मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. एम. बी. पाटील हे २००४, २००८, २०१३, २०१८ असे सलग चारवेळा विजयी झाले आहेत.ते यंदा पाचव्यांदा निवडणुका लढवत आहेत.त्यांचे वडील आ. बी. एम. पाटील तीनवेळा निवडून आले आहेत.

Rate Card

आयपीएलवर बेटींग घेणाऱ्या टोळीला सांगलीत पकडले,चौघे ‌ताब्यात

मतदारसंघावर पाटील घराण्याचे ३५ वर्षे वर्चस्व आहे. तर भाजपचे विजयगौडा पाटील हे सलग तिसऱ्या वेळी निवडणूक रिंगणात आहेत.काँग्रेसचे पाटील हे जलसंपदा,नगरविकास मंत्री होते. त्यांनी तुबची-बबलेश्वर सिंचन योजना, तलाव भरण्याची योजना प्रभावीपणे राबविली आहे.

भाजपचे विजयगौडा पाटील हे पंचम लिंगायत समाजाचे आहेत.त्यांची मतदारसंख्या जास्त आहे.तरीही त्यांना विजयासाठी झगडावे लागत आहे.यंदा मतदार कौल कुणाला देतात. हे निकालानंतर स्पष्ट होणार असून कॉग्रेसचे बडे नेते एम.बी.पाटील यांच्यामुळे या मतदार ‌संघाकडे दोन्ही पक्षाच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांचेही लक्ष आहे.येथे देश पातळीवरील नेतेही ‌प्रचारासाठी येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.